धरणगाव (प्रतिनिधी) शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी भाजपतर्फे म.रा.वि.कंपनीचे कार्यकारी अभियंता पवार यांना निवेदन देऊन केली आहे. तसेच तात्काळ वीज कनेक्शन तोडणी थांबविण्यात आली नाही तर भाजप शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील शेतीपंपाची वीज कनेक्शन अचानकपणे कट करण्याचे काम वीज कंपनीच्यावतीने सुरू आहे. शेतकऱ्यास कुठलीही माहिती न देता त्यांचे नुकसान करण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. शेतकऱ्याची रब्बी हंगामास सुरुवात झालेली असून पेरणी सुद्धा झालेली आहे. पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीज कनेक्शन तोडल्याने पीक वाया जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे .त्यासाठी आपण तात्काळ वीज कनेक्शन तोडणी थांबवून वीज कनेक्शन जोडणी करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी भाजपचे जेष्ठ नेते शिरीषआप्पा बयास, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, ता.सरचिटणीस सुनील पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निर्दोष पाटील, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, राजू महाजन, पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.