नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका महिलेनं आता अतिशय अजब दावा केला आहे. एका एलियनला भेटल्यानंतर ती गरोदर राहिल्याचं महिलेचं म्हणणं आहे नावाच्या शीर्षकाच्या अहवालात यूएस संरक्षण मंत्रालयाने ‘अलौकिक अनुभव’ असल्याचा दावा करणाऱ्या लोकांच्या आरोग्याची तपासणी केली. यातील काही प्रकरणं अतिशय साधी, काही अतिशय विचित्र तर एक केस ‘गूढ गर्भधारणा’ ची होती. अहवालात एलियन किंवा यूएफओ जवळ आल्यावर दिसणाऱ्या प्रभावांची सूची समाविष्ट आहे.
यामध्ये दुखापतीपासून ते अपहरण आणि ‘सेक्स’ तसंच ‘मृत्यू’चीही पाच प्रकरणे आहेत. यादीत सहभागी इतर अनुभवांमध्ये वाईट स्वप्न, आवाज अचानक बंद होणं, डोळ्यांना दुखापत, श्वास घेण्यास त्रास आणि वजन कमी होणे यांचा समावेश आहे. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA) कडून मिळालेल्या दस्तऐवजाचा हवाला देत द सनने हे निकाल प्रकाशित केले आहेत. अहवालानुसार, यामध्ये सरकारद्वारे तयार करण्यात आलेले वैज्ञानिक अहवाल आणि UFO प्रोग्रामशी संबंधित पेंटागॉनच्या पत्रांचा समावेश आहे.
अहवालानुसार, ‘बाहेरील विमानांशी संपर्क झाल्यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी ४२ प्रकरणे मेडिकल फाईलची आहेत आणि ३०० प्रकरणे ‘अप्रकाशित’ आहेत, ज्यात माणसं जखमी झाली आहेत. निकालाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक झाल्यानंतर सोशल मीडियावर काहींनी त्याची खिल्ली उडवली. ट्विटरवर एका युजरने लिहिलं की, ‘माझ्या मोठ्या पोटाचा अर्थ असा नाही की मी लठ्ठ आहे, तर मी रहस्यमयपणे गर्भवती आहे.’