जळगाव (प्रतिनिधी) असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सामान्य रुग्णालय यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय डॉ. एन एस चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रभारी नगराध्यक्षा कल्पना महाजन, प स सभापती मुकुंद नन्नवरे, प स सभापती शारदा पाटील, नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, जि प सदस्य गोपाल चौधरी, प्रांत विनय गोसावी, तहसीलदार, नितीन देवरे, डॉ. उदय बेंडाळे, डॉ. कांचन नारखेडे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, भगवान महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. गिरीश चौधरी, डॉ. संजय सोनवणे यांनी केले होते. सूत्रसंचलन मुकुंद गोसावी यांनी केले.
















