धरणगाव प्रतिनिधी । शहरातील डॉक्टरांनी एकत्र येवून सर्वोत्तम आरोग्य सेवेचा वसा घेऊन सुरु करण्यात आलेले “श्री साई ” हॉस्पिटल रुग्णासाठी वरदान ठरेल. गरीब रुग्ण हा केंद्रबिंदू मानून डॉक्टरांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करावे. जिल्ह्यात ऑक्सिजनची कृतीम टंचाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. धरण्गावातील श्री साई हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते.
धरणगाव शहरात पहिल्यांदा कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात आले. यावेळी ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, रुग्णांकडून भरमसाठ फी न घेता शासनाच्या नियमाप्रमाणे फी आकारावी. हॉस्पिटल मध्ये व्हेटीलेटर, ऑक्सिजन , मल्टीपेरा व अनुषंगिक बाबी योग्य प्रमाणात ठेऊन योग्य वेळी योग्य औषधींचा वापर करा. रुग्णांचे मनोधेर्य वाढविण्यासाठी संगीत व योग प्राणायाम सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डॉक्टरांना दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शहरातील वैद्यकीय व महसूल प्रशासनाचे कौतुक केले. नगराध्यक्ष निलेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला ना.गुलाबराव पाटील व मान्यवरांनी “श्री साई” या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येऊन मान्यवरांचा सत्कार डॉ.सुयेश पाटील व डॉ. धिरज पाटील यांनी केला.कर्तव्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल चौधरी यांनी त्यांच्या मंगल कार्यालय कोविड सेंटर साठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सत्कार केला.
उद्घाटनाप्रसंगी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ , नगराध्यक्ष निलेश चौधरी, एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, वैद्यकीय अधिकारी गिरीश चौधरी माजी नगराध्यक्ष न्यानेश्वर महाजन, सुरेश चौधरी, कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी, किशोर चौधरी, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद डहाळे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष मनीष लाड, भाजपा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, पी. आय. पाटील, श्रीमती बोरे , जीवन बयास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कोविड सेंटरसाठी डॉ. संदीप सराफ, डॉ धनंजय पाटील, डॉ मनिष जैन डॉ लुबना शेख यांनी यशस्वी नियोजनासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.धिरज पाटील यांनी हॉस्पिटलची भूमिका विषद केली. सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील सर व विलास माळी यांनी केले तर आभार डॉ. सुयेश पाटील यांनी मानले.