यावल (प्रतिनिधी) यावल येथील बोरखेडा बुद्रुक परिसरात वन विभागाने धडक कारवाई करत २ अवैध गावठी दारू भट्ट्यांचा पर्दाफाश केला आहे. १६०० लिटर गावठी दारूचे रसायन, प्लास्टिक बॅरल्स आणि लोखंडी साहित्य जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले. वन विभागाने आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
आज सकाळी वनपरिक्षेत्र यावल पूर्व अंतर्गत बोरखेडा बुद्रुक येथील कक्ष क्र. 35 मध्ये वन विभागाने मोठी कारवाई करत २ अवैध गावठी दारू भट्ट्यांचा पर्दाफाश केला. महसुली हद्दीपासून 500 ते 1000 मीटर अंतरावर चिचखोपा नाला व भवानी नाला परिसरात हे भट्ट्यांचे रसायन (१६०० लिटर) सापडले. यामध्ये ५६,००० रुपये किमतीचे रसायन व प्लास्टिक बॅरल जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच, ४ लोखंडी बॅरल आणि इतर लोखंडी साहित्य अंदाजे २,००० रुपये किमतीचे जप्त करण्यात आले.
वन विभागाने पुढील तपासासाठी गुन्हा नोंदविला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सदर कारवाई वनसंरक्षक निनु सोमराज, उप वनसंरक्षक जमीर शेख आणि विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगिर यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.
अद्ययावत तपास व सहकार्य
या कारवाईमध्ये वनपाल गस्ती पथक आणि राज्य उत्पादन शुल्क भुसावळचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले.