जळगाव (प्रतिनिधी) येथील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कुलचे हिमांशु छाजेड, संभव उल्हास या दोन्ही विद्यार्थ्यांनी पंकज रमेश रंधे यांना त्यांचे हरवलेले महत्वाचे कागदपत्र व रोख रक्कम परत केल्याबद्दल पोलीस उपअधीक्षकांनी दोघांचा सत्कार केला आहे.
हिमांशु रितेश छाजेड (रा. विनोबा नगर जळगाव), संभव उल्हास जैन (रा. आदिनाथ सोसायटी शिवराम नगर, जळगाव) हे दोघ विद्यार्थी शहरात सकाळी सायकलींग करीत असतांना शिरसोली रोडवर कृष्णा लॉन जवळ या विद्यार्थ्यांना एक पाकीट पडलेले दिसले. ते पाकीट मुलांनी उचलले व घरी वडिलांना फोनद्वारे कळवुन पाकीटात मिळालेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन पंकज रमेश रंधे (रा. नशिराबाद ता जि जळगाव) यांचे पाकीट असल्याचे समजल्याने पाकीटात मिळालेले महत्वाचे कागदपत्र तसेच १५०० रुपये रोख परत केले. पंकज रमेश रंधे यांना त्यांचे हरवलेले महत्वाचे कागदपत्र व रोख रक्कम परत मिळाल्याने त्यांनी हिमांशु छाजेड, संभव उल्हास या दोन्ही विदयार्थी हे रुस्तमजी इंटरनॅशनल स्कुल शाळेचे विदयार्थी असुन त्यांच्या चांगल्या कामगिरीबाबत पोलीस उपअधिक्षक यांनी सत्कार केला.