TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त कुऱ्हे पानाचे वनखंडात अभ्यासदौरा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2020
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) दि. 2 ते 8 ऑक्टोबर वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे वनक्षेत्र विभाग, वन्यजीव संरक्षण संस्था आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे आयोजित अभ्यास दौऱ्यांतर्गत 453 हेक्टर कुऱ्हे पानाचे वनखंड 12 नंबरमध्ये पार पडलेल्या एकदिवशीय अरण्यवाचनात प्राणी, पशु, पक्षी, झाडी, झुडपे, वनस्पती यांच्या विविधांगी प्रजातींचे दर्शन घडले.

कुऱ्हे पानाचे वनक्षेत्राचे वनपाल प्रल्हाद महाजन, कुऱ्हे पूर्वचे वनरक्षक संदीप चौधरी, कुऱ्हे पश्चिमचे वनरक्षक विलास काळे, भास्कर पाटील, नरेंद्र काळे, शिवदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा पार पडला. यात कुऱ्हे पूर्वचे वनरक्षक संदीप चौधरी, कुऱ्हे पश्चिमचे वनरक्षक विलास काळे, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र सतीश कांबळे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांच्यासह सुरेंद्र चौधरी, डी. के. पाटील, संजीव पाटील, डॉ. जगदीश पाटील, सुरेंद्रसिंग पाटील, संजय ताडेकर यांचा समावेश होता. पहाटेपासून कुऱ्हे पानाचे बारा गट नंबरमधील जामनेर रोड ते वाघूर धरणाच्या बॅक वॉटरपर्यंतच्या परिसराचे अरण्यवाचन करण्यात आले.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

यात जैवविविधता, गवताच्या प्रजाती, पाणवठे, वन्य प्राणी, त्याचे पाऊलठसे, पशुपक्षी, त्यांचा अधिवास, तृण, वनस्पती यांचे निरीक्षण व आकलन करण्यात आले. यात सामान्यपणे आढळलेल्या वनस्पती विष्णुकांत, माका, टाकळा, आवळी, पत्थरशेपु, भुईगेंद, आग्या, एकदांडी, गोधडी, झारवड, सोनकी, अर्जुन सदडा, बेहडा, साल, कडुलिंब, बकाम, सलाई, साग, आराट, बोरती, बोर, पळस, व्यांखाई, बहावा, अमलताश यासह काटेरी झुडूपवर्गीय वनस्पती मोठ्या संख्येने आढळल्या. त्यात सोंनटिकली, मेकीं, चिलार, कुर्डु, लिकस सेफॉलोटस, कुसळ, बाभूळचा प्रकार मिमोसो हमाता, ग्लोरिसा सुपरबा, कळलावी आधी प्रकार आढळून आले. गवताच्या शाहद्या , पवण्या, गोंडळी, कुसली, कुंदा, रोयश्या, अशा प्रजाती आढळल्या.

त्याचप्रमाणे अरण्यवाचनात चंडोल, करवानक, शिक्रा, मधुबाज, लाल मुनिया, इंडीयन सिल्व्हरबिल, खाटीक, खंड्या, रंगीत तितर, तुईया, सोनपाठी सुतार, पिवळ्या कंठाची रानचिमणी, रानखाटीक, बुलबुल, चिरक, दयाळ, जांभळा शिंजीर, निखार घार आदी पक्षी दृष्टिक्षेपास आले. तसेच नीलगाय, बार्किंग डिअर, फ्यान थ्रोटेड लिझर्ड आदी प्राण्यांचेही दूरवरून दर्शन झाले. बऱ्याच ठिकाणी सुगरण पक्ष्यांचा अधिवास आढळून आला. वन्यप्राणी अधिवासाच्या असंख्य खुणाही जाणवल्या तसेच ठिकठिकाणी प्राणी, पशुपक्षी यांच्या विष्ठा आढळल्या. जंगल सीमेवरील स्थानिकांना याबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन व सुविधा पुरवावी तसेच वन्यजीवांबद्दल माहिती मिळवून त्यांचा जीवनक्रम समजून घ्यावा; ज्यामुळे त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात. तसेच वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल तोडण्यास नेहमी विरोध दर्शवावा, अशा हेतूने अभ्यासदौरा पार पडला.

कोरोनामुळे गुळवेलवर संक्रांत – गेल्या सहा महिन्यांपासून थैमान घातलेल्या कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय म्हणून गुळवेलचे महत्व पुढे आले. त्यामुळे कुऱ्हे पानाचे वनखंडातून गुळवेल नेल्याने अतिशय कमी प्रमाणात गुळवेल निदर्शनास आली. गुळवेलचे कमी होत असलेले प्रमाण चिंताजनक ठरले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

किसान काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी सुभाष पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परळीत मुंडे बहिण-भाऊ एका मंचावर, भाषणात जोरदार टोलेबाजी !

August 31, 2021

रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून २० लाखांचा दंड वसूल !

October 26, 2023

झुरखेडा व निमखेडा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन !

February 11, 2024

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्ताने १८ डिसेंबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

December 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group