TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खरिप 2023 ची पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश !

vijay waghmare by vijay waghmare
October 11, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2023- 24 च्या खरिप हंगामातील पिकांचा पिक विमा काढला होता. मागील वर्षी या तालुक्यात पावसाचा खंड पडून दुष्काळ निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकरी विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते. परंतु, राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम न भरल्यामुळे शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत होता. शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असुन 2023 च्या खरिप हंगामातील पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बोदवड तालुका अध्यक्ष प्रशांत आबा पाटील यांनी माहिती दिली.

बोदवड, मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील महसूल मंडळात काही ठिकाणी पावसाचा खंड तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता. यामुळे या तालुक्यातील शेतकरी खरिप हंगाम 2023 चा पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते. जळगाव जिल्ह्याला खरिप हंगाम 2023-24 साठी शासनातर्फे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाने आपल्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास विलंब होत होता. ही बाब लक्षात घेऊन आ एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चे, आंदोलन, निवेदनाच्या माध्यमातून पिक विम्याची रक्कम मिळण्याबाबत शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. बोदवड तालुक्यात सरसकट नुकसान झालेले असून सुद्धा विमा कंपनी टाळाटाळ करत होती. त्यासाठी रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष आबा पाटिल आणि माझे सहकारी सतिष पाटिल, निलेश पाटिल यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या नागपूर येथील क्षेत्रीय कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीच्या तक्रार नोंदणी पासून नुकसानीच्या प्रत्येक टप्प्यात बोदवड तालुका सर्व भरपाई निकषात बसतो अशी बाजू मांडून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जावी हे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले होते.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

पिक विमा नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात

राज्य शासन आपल्या हिस्स्याची रक्कम भरण्यास विलंब करत असल्याने शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत होता राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम भरावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यात यावी यासाठी रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकारी, कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असुन राज्य शासनाने त्यांच्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली असुन शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यात बोदवड तालुक्यातील 12 हजार 959 शेतकऱ्यांना 17 कोटी 84 लाख, मुक्ताईनगर तालुक्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 9 लाख 51 हजार, रावेर तालुक्यातील 890 शेतकऱ्यांना 50 लाख अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

यासाठी बोदवड तहसीलदार कृषी विभाग, आणि इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले
अशी माहिती प्रशांत (आबा) पाटिल यांनी दिली
तसेच चालू खरिप हंगाम 2024 मध्ये सुद्धा अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले. या खरिप हंगामाची सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही पाठपुरावा करत असल्याचे सतिष पाटिल यांनी सांगितले. यावेळी बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटिल, रामदास पाटिल, सतिष पाटिल, निलेश पाटिल उपस्थित होते.

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरिप 2023 हंगामात मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकरी बांधव पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सतत पाठपुरावा केला त्याला यश आले असून शेतकरी बांधवांच्या खात्यात पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा. चालु खरिप हंगामात झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्याची आम्ही प्रयत्नशील आहोत, असे रोहिणी खडसे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा- ३ अंतर्गत २४ जिल्ह्यातील दुपदरी सिमेंट क्रॉकिंट रस्त्यांचे ऑनलाईन भूमिपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हाट्सॲपवर महिला डॉक्टरला पाठवले अश्लील संदेश ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

September 12, 2022

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत; क्लेयर पोलोसाक पुरुषांच्या सामन्यातील पहिल्या महिला अम्पायर

January 7, 2021

शेती वादातून शेतकर्‍याला विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न ; त्रिकूटाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा

July 8, 2023

जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘फाउंडर्स डे’ उत्साहात !

December 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group