यावल (प्रतिनिधी) काँग्रेस सेवा फाउंडेशनने यावल तहसीलदार महेश पवार यांना पुढील आठवड्यात सदरील लाभार्थ्यांना थकीत अनुदान मिळणेकामी निवेदन देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेसह इतर सर्वच योजनेचे ४ महिन्यापासून रखडलेले २ महिन्याचे पगार लाभार्थ्यांना खात्यावर जमा झालेले असून उर्वरित पगार दिवाळीच्या आधी मिळणार आहे.
काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या मागणीला यश आल्यामुळेअनेक गोरगरीब आदिवासी, दलित, अल्पसंख्यांकसह इतर लाभार्थ्यांनी फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांच्यासहित सरपंच विलास अडकमोल, जिल्हाउपाध्यक्षा मीनाक्षी जावरे, लोकसभा अध्यक्ष सद्दामशाह, अमोल भिरुड, शहराध्यक्ष नईम शेख, तालुकाध्यक्ष अभय महाजन, मीडिया प्रमुख धीरज पाटील, बशीर तडवी, पुंडलिक बारी, अशपाक शाह सहित काँग्रेस सेवा फाऊंडेशन काँग्रेस पक्षाचे आभार मानले आहे.