जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत म्हसावद औटपोस्ट येथे पोलीसांच्या ताब्यातील संशयित तरूणाने शौचालयातील काचेच्या सहाय्याने गळ्यावर मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका गुन्ह्यात संशयित आरोपी मंगल सुशांत बरमन (वय २७ मुळ, रा. पश्चिम बंगाल) याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या म्हसावद औटपेास्ट येथे शनिवारी (ता. १७) दुपारी बसवून ठेवण्यात आले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्याने बाथरूमला जातो असे सांगून संशयित आरोपी मंगल बरमन बाथरूममध्ये गेला. त्या ठिकाणी त्याने खिडकीचा काचा तोडल्या व त्यातील एका तुकड्याने स्वतःच्या गळ्याला मारून घेतले. ही घटना पोलिसांच्या लक्षात आल्याने त्याला तातडीने घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून त्याचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.या संदर्भात सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मंगल बरमन याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे. दरम्यान, जखमी तरुण वेडसर असून त्याला अटक केलेली नव्हती किंवा ताब्यातही घेतले नव्हते. तो रेल्वेतून उतरला अन् वाट चुकून चौकीत आला. पोलिसांनी चौकीजवळ बसून त्याला जेवण दिल, पाणी दिलं. थोड्या वेळात ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितले.
















