TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दर्जेदार रस्ते म्हणजे विकासाचा दुवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
August 28, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) दळणवळणाच्या साधनांसाठी रस्ते हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा मुद्दा असून शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते विकासाचा दुवा ठरत आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथे रस्ते भूमिपूजन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचेसह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे होते.

धरणगाव नगरपालिका हद्दीतील स्वामी समर्थ नगर गट क्रमांक ३०६ मध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण करणे (६० लक्ष) गनाबाप्पा नगर गट क्रमांक ३०५ मध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण करणे (५७ लक्ष) अशा दोन्ही रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी १ कोटी १७ लक्ष निधी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नगरोत्थान मधून मंजूर करण्यात आलेला आहे. नुकतीच या कामाची वर्कऑर्डर काढण्यात आली असून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सदर दोन्ही कामांच्या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

यावेळी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, न.पा.च्या पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध व नियोजन करून कामे करावी, शहरातील हातात घेतलेली संपूर्ण कामे पूर्ण करणार असून स्वामी समर्थ नगरातील खुल्या जागेचा विकास करणार आहे त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. धरणगाव शहरात विविध प्रकारचे विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याने विरोधक केवळ विरोधाला विरोध म्हणून राजकारण करत असल्याची टिकाही ना. गुलाबराव पाटील यांनी केली. यावेळी बाल कवयित्री कु. देवर्षी महाजन तसेच आयान अलिम शिरपूरकर यांचा प्रथम आल्या बद्दल सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

दोन शिवसेना शाखां फलकांचे अनावरण !

शहरातील जैन गल्ली व बालाजी गल्ली येथे शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना शाखा फलकांचे अनावरण करण्यात आले. जैनगल्ली शाखा प्रमुख म्हणून राजमाल संचेती, अक्षय मुथा यांची तरबालाजी गल्ली येथे गणेश महाजन यांची शाखा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सत्कार केला. सदरच्या दोन्ही रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामांमुळे नागरिकांची गैरसोय दूर होऊन त्यांना चांगल्या सुविधा मिळतील त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी पालकमंत्र्यांचा सत्कार करून आभार मानले.

याप्रसंगी सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी शहराचा विकास हा झपाट्याने होत असल्याने विरोधक हादरले आहेत. सदर परिसरातील ओपन स्पेसचे विकास करण्यासाठी त्यांनी पालकमंत्री यांना साकडे घातले. यावेळी दोन्ही कॉलनी वासीयांतर्फे संजयनाना पवार, उपशिक्षक आर.डी. महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.

रस्ते भूमिपूजन प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, न पा गटनेते पप्पू भावे शहर प्रमुख राजेंद्र महाजन, माजी नगराध्यक्ष सौ. उषाताई वाघ, संजयनाना पवार, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, नगरसेवक विलास महाजन , विजय महाजन, अरुण पाटील, अनुपम अत्तरदे, व्ही आर पाटील, कैलास महाजन, किरण पाटील, कार्तिक पाटील, ज्ञानेश्वर माळी, सुरेशनाना चौधरी, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, मुख्याधिकारी जनार्धन पवार यांच्यासह स्वामी समर्थ नगर व गनाआप्पा नगर भागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर रोकडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार कैलास पवार यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
Next Post

पदोन्नती मिळाल्याबद्दल बशीर गुलाब तडवी यांचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तक्रारीसाठी फोन केला आणि थेट गृहमंत्र्यांशी संवाद झाल्याने पुणेकराला आश्चर्याचा धक्का

January 1, 2021

भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS) तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !

May 22, 2024

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन !

September 27, 2020

जयश्रीताई तुम आगे बढो म्हणत… महिलांकडून जयश्रीताईंना जोरदार प्रतिसाद !

November 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group