चोपडा (प्रतिनिधी) अत्याचारातून गर्भवती झालेल्या एका अपंग महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यात उघडकीस आली आहे. मेहुण्यासह इतर ३ जणांनी केलेल्या आत्याचारातून पिडीत महिला ६ महिन्याची गर्भवती राहिली. हा त्रास सहन न झाल्याने पीडितेने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय महिला अपंग असल्याने भावाकडे राहत होती. दरम्यान तिचे मेहुणे देवीदास पुंडलिक सपकाळे याच्यासह अविनाश देवीदास सपकाळे आणि आनंद देवीदास सपकाळे या तिघं भावांनी पिडीतेचा अपंग पणाचा फायदा घेत, तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून महिला ६ महिन्याची गर्भवती राहिली. हा त्रास सहन न झाल्याने पीडीत महिलेने २४ जानेवारी रोजी सकाळी आत्महत्या केली. याप्रकरणी पीडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी देवीदास पुंडलिक सपकाळे, अविनाश देवीदास सपकाळे आणि आनंद देवीदास सपकाळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किरण दांडगे करीत आहे.