हैदराबाद (वृत्तसंस्था) जेष्ठ अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती खालावली असल्याने हैदराबादमधील अपोलो रूग्णालयात त्यांना दाखल केल आहे. अपोलो रूग्णालयाकडून यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढत यासंदर्भात माहिती देण्यात आलीये. यामध्ये रजनीकांत यांचा ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात अॅडमीट केलं आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांना शुक्रवारी सकाळी हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय रजनीकांत यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. परंतू, रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. जोपर्यंत त्यांचा रक्तदाब सामान्य होत नाही, तोपर्यंत त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात येईल. रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच रोखण्यात आलं होतं. कारण क्रूमधील सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर रजनीकांत यांनी स्वत:ला चेन्नईमधील आपल्या फार्महाऊसमध्ये क्वॉरन्टाईन केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे रजनीकांत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे ‘अन्नाथे’चं चित्रीकरण जवळपास नऊ महिन्यांसाठी थांबवण्यात आलं होतं. यानंतर १४ डिसेंबरपासून हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली होती. परंतु क्रूमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा चित्रीकरण रोखण्यात आलं. दरम्यान अन्नाथे या चित्रपटाचं दिग्दर्शन सिरुथई सिवा करत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह नयनतारा आणि किर्ती सुरेश महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.
रजनीकांत आणि नयनतारा त्यांच्या आगामी ‘अन्नाथे’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आले आहेत. त्यांनी शूटिंगला सुरुवातही केली, मात्र शूटिंगच्या क्रूमधील ८ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आले. यानंतर, २२ डिसेंबर रोजी रजनीकांत यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. तेव्हापासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले होते.