धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्याच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून शासनाने श्रीमती रेवना राजू कांबळे यांची नियुक्ती केली आहे. त्याबद्दल धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे श्रीमती रेवना यांचा स्वागत समारंभ करण्यात आला. यावेळी धरणगाव तालुक्याचे लाडके तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे अध्यक्ष स्थानी होते तर पुरवठा सहाय्यक रविंद्र म्हसकर देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक व सूत्र संचलन राजू ओस्तवाल यांनी केले तसेच सर्व दुकानदार बांधव यांचा परिचय करून दिला. तर सत्कार संघटनेचे अध्यक्ष जी डी पाटील, उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, सचिव बंटी ओस्तवाल तसेच अमोल पाटील, सलमा भाभी, रवी महाजन, संजय गुप्ता, विनोद गुप्ता, महेंद्र चौधरी, गुलाब पाटील, बाभले अनिल गुप्ता, निलेश बाजपाई, राजा गुप्ता, राजू कोळी, बी एल पाटील आदी असंख्य दुकानदार बांधव उपस्थित होते.