मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठीही मलिक आणि देशमुख यांना मतदानाची परवानगी देण्यात आली नव्हती. आता विधान परिषदेसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मत कमी झाली आहेत. विधान परिषदेसाठी आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधान परिषदेचा निकाल हाती येणार आहे. काँग्रेसचे भाई जगताप विरुद्ध भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. मलिक आणि देशमुख यांना हायकोर्टानेही नकार दिला होता. आता सुप्रिम कोर्टानेही मतदानाचा अधिकार नाकारला आहे. अनिल देशमुख यांना १०० कोटी खंडणी प्रकरणी अटकेत आहेत.