अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथील दोन लहान मुलांचे अपहरण करून पळालेल्या आरोपीला अमळनेर येथील सुजाण नागरिक सुरेश दाभोडे यांच्या समयसुचकतेने व धाडसाने पोलिसांनी आरोपीला अटक केली व त्या दोन्ही चिमुकल्यांची देखील सुखरूप सुटका झाली. या कार्याचे अमळनेरमध्ये विशेष कौतुक होत आहे. कुबेर ग्रुप व पाचपवली कट्टातर्फे सुरेश दाभोडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुबेर ग्रुपचे अध्यक्ष महेंद्रभाऊ महाजन, गुलाम नबी, भय्या महाजन, राहुल पाटील, अमोल बडगुजर, चेतन देशमुख, गजू, राहुल, देवेंद्र, आकाश आदी कार्यकर्ते उपस्थित होते.