जळगाव (प्रतिनिधी) रिक्षात बसलेल्या पाळीव कुत्र्यास हाकलल्याचा राग आल्यामुळे मालकाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याचा दाखल गुन्ह्यात तब्बल सातवर्षानंतर एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संशयितास अटक केली. संशयिताला सात वर्षानंतर ताब्यात घेतल्याने सगळीकडे एकच हशा पिकला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार (ता.६ ऑक्टोबर २०१५) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गिरीष अशोक गायकवाड याचा पाळीव कुत्रा सुरेश मधुकर गायकवाड याच्या रिक्षात बसला होता. रिक्षात कुत्रा बसल्याचा राग आल्याने सुरेश गायकवाड याने त्याला हटकले होते. त्यानंतर गिरीष गायकवाड याने सुरेश गायकवाड व त्याच्या पत्नीला शिवीगाळ व दमदाटी करत दगड मारुन जखमी केले होते. सात वर्षापासून फरार असलेला गिरीष गायकवाड जळगाव शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी त्याला अटक केली.