सुरत (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीचे एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय पत्नीला होता. म्हणून पत्नीने त्या तरुणी भर बाजारात केस कापले. तेव्हा पीडित तरुणी जोर जोरात ओरडून मदतीची याचना करत होती, परंतु कोणीही तिच्या मदतीला धावून आले नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील पलसाना तालुक्यातील तातीथईया गावातील हा व्हायरल व्हिडीओ असल्याचं बोललं जातं. संबंधित तरुणी आरडाओरड करुन स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र त्यावेळी काही जण पोट धरुन खो-खो हसत सुटले होते. पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेशिवाय दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सुरत ग्रामीण भागाच्या एसपी उषा राडा यांनी सांगितलं की आपल्या पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय होता. यावरुन दोघींमध्ये आधीही भांडण झालं होतं. त्यानंतर तरुणी मध्य प्रदेशातील आपल्या घरी निघून गेली होती. काही दिवसांपूर्वी ती कडोदराला परतल्याचं पत्नीला समजलं. त्यामुळे दोघींमध्ये पुन्हा खटके उडाले. बाचाबाचीनंतर आरोपी महिला सेकन्तीसह तिच्या दोन मैत्रिणींनी तरुणीला धरलं. त्यानंतर तिचे केस कात्रीने कचाकचा कापले.