एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडे सिम येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश जगन्नाथ आमले (पाटील) यांच्या अपात्रेला राज्याचे अवर सचिव नीला रानडे यांच्या आदेशान्वये स्थगिती मिळाली आहे.
जवखेडे सिम ता एरंडोल येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश जगन्नाथ आमले (पाटील)यांना अतिक्रमण प्रकरणी अप्पर आयुक्त नाशिक यांनी दि 22 जुलै रोजी अपात्र ठरवले होते. लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले यांनी याबाबत तात्काळ मुख्यमंत्री यांच्याकडे दि. 27 रोजी अपील दाखल केले होते. त्यानंतर तात्काळ स्थगितीचे आदेश मुख्यमंत्री यांचे सचिव यांनी 29 रोजी काढले होते. विशेष म्हणजे त्यावेळेस मुख्यमंत्री यांच्याकडे सर्व खात्यांचा कारभार होता. मुख्यमंत्री यांच्या सचिवांनी जिल्हाधिकारी जळगाव, अप्पर आयुक्त नाशिक, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तातळीने आदेश पाठवले आहेत. याबाबतचे आदेश लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले यांना आज प्राप्त झाले आहेत. जवखेडेसिम ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीला अवघ्या 2 महिन्याचा कालावधी बाकी आहे.
















