TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रयोगशिलतेतून शेतकऱ्यांचा शाश्वत विकास : दिलीप जोशी !

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यानमाला संपन्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कृषी संस्कृती हे भारताचे वैभव असून शेतकरी स्वत: संशोधकवृत्तीने काम करतो. कुठलेही प्रयोग शाळेतील संशोधन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच निसर्गाकडे डोळसपणे पाहून जे शेतातील आहे तेच मातीत टाकले तर जमीन सूपीक ठेवता येईल. यात जमीनीची शेती न करता सूर्य प्रकाशाची शेती करावी, त्यासाठी व्हिजन असलेली दूरदृष्टी हवी हे व्हिजन शेतकऱ्यांमध्ये भवरलाल जैन यांनी निर्माण केले. त्यांच्या जीवनातील प्रयोगशिलता हाच शेतकऱ्यांसाठी शाश्वत विकासाचा मार्ग आपण सर्वांनी स्विकारावा असे आवाहन पर्यावरण कार्यकर्ता व अभ्यासक दिलीप जोशी यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘बंजर भूमि और बंजर मन से मुक्त पृथ्वी’ या विषयावर डॉ. भवरलालजी जैन स्मृति व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार होते. त्यांच्यासोबत गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अनिल जैन, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. आरंभी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मेरी भावना ही प्रार्थना आणि नमोक्कार मंत्र सादर केले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

प्रास्ताविक अनिल जैन यांनी केले. त्यात ते म्हणाले, ‘जगाला दिशा देण्याचे काम भारत करत आहे. भारतातील शेतकऱ्यांमुळेच संवेदनशिल समाजनिर्मिती होत आहे. शेत, शेतकरी यांच्यात सकारात्मक बदल कसा होईल, याचा ध्यास भवरलालजी जैन यांनी घेतला. ज्ञान विज्ञानातून पुढे आलेले संशोधन थेट सहजसोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल यासाठी अव्याहतपणे त्यांनी कार्य केले. आपल्या मातीशी आत्मीयता ठेवावी हाच संस्कारातून ‘पाणी थेंबाने पिक जोमाने’ हे ब्रिद तंत्रज्ञानाच्या रूपात शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले. संशोधन पोहचवित असताना शाश्वत पर्यावरण कसे सांभाळे जाईल याचीही काळजी घेतली. हाच संस्कार घेऊन निसर्गाकडून जे घेतले त्याहीपेक्षा अधिक सुंदर कसे करता येईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.

‘बंजर भूमि और बंजर मन से मुक्त पृथ्वी’ या विषयावर पुढे मार्गदर्शन करताना दिलीप जोशी यांनी निसर्गाकडून जे संसाधन आपल्याला प्राप्त होतात ते कसे चांगले राहतील यासाठी निरीक्षणातून समजून घेतले पाहिजे. रोगमुक्त, परिपुर्ण शेती करण्यासाठी निसर्गाशी एकरूप कसे होता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेती हे विज्ञान आहे हे समजून घेतले पाहिजे. देशातील प्रत्येक शेतकरी हा प्रयोगशील शेतकरी आहे. फक्त कुठेलेही जगातील नवीन संशोधन जे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणतील ते शास्त्र, ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे अपेक्षित असून हेच काम भवरलालजी जैन यांनी केले. त्यांनी सृजनशक्तीचा वापर करून बंजर जमीन सुजलाम् सुफलाम् केली आणि आजही पुढची पिढी शेतकऱ्यांसाठी ते काम करीत आहे. शेतीत भविष्य असून यातील उदासिनता दूर करणे हाच भवरलालजी जैन यांचा धर्म राहिला. आपल्या मातीशी एकनिष्ठ राहून, भूमिची सेवा विज्ञान व माहिती तंत्रज्ञानातून, प्रयोगातून त्यांनी केली. पर्यावरण अभ्यासक व कार्यकर्ते तसेच एनआयडी पहिल्या बॅचचे पदवीधारक असलेले दिलीप जोशी यांनी दाभोळकरांच्या प्रयोग परिवाराने केलेले शेतीविषयक संशोधन आणि त्यांनी त्यात केलेले कार्य सादरीकरणातून सांगितले. यानंतर मुक्तसंवादामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसनही दिलीप जोशी यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी मानवता टिकविण्यासाठी शेतकऱ्यांमधील स्थिरता महत्त्वाची असून प्रयोगशिलतेतून भवरलाल जैन यांनी हे स्थैर्य शेतकऱ्यांच्या जीवनात आणले. शेती करताना शाश्वत उत्पादन क्षमता कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले. डॉ. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले. गिरीष कुळकर्णी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने व्याख्यानमालेची सांगता झाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 ऑक्टोबर 2026 !

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
Next Post

जबरी चोरीसह विनयभंगच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ शहरात दोन बनावट गावठी पिस्टल सह 5 जिवंत काडतुसे जप्त !

September 19, 2022

धक्कादायक : गुप्तांग कापून ठार मारण्याची धमकी देऊन १४ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

December 21, 2021

जळगाव : पाठलाग करून शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवली !

July 2, 2023

धरणगावच्या चौधरी कुटूंबाला ठाकरे परिवाराकडून निष्ठेची भेट

October 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group