जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात बोगस बियाणे व बोगस खते व किटकनाशकांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनाव्दारे जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गुजरात राज्यातून मोठया प्रमाणात बोगस बियाणे व बोगम खते, किटकनाशके जिल्हयात सर्रास विक्री केली जात असून कृषी विभाग डोळ्यावर काळी पट्टी बांधुन आहे. बोगस बियाणे, किटकनाशके, खते, जिल्हयातील चाळीसगाव, भडगाव, पारोळा, एरंडोल, चोपडा, अमळनेर आदी भागात विकली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची फसवणुक होत आहे. बोगस बियाणे,खते, किटकनाशके विकणाऱ्या दुकानदारांचे मोठे रॅकेट असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळाली आहे. जिल्हा कृषी विभागाने अशा विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवेदनाव्दारे जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मोठ्या दुकानदारांकडुन सुध्दा खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे. तसेच युरीया घ्यायचा असेल तर त्यासोबत जबरदस्तीने पोटॅश घ्या अशी सक्ती केली जात आहे. अशा प्रकारे अनेक खताची सक्ती केली जात आहे. विशीष्ट कंपन्याचे बोगस स्टीकर-प्रिंटींग करून शेतकरी फसवला जात आहे. किटकनाशके विकतांना त्यामध्ये अधिक प्रमाणात विषारी घटकाचा वापर करण्यात येवुन याचा परिणाम पिकांसह सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. विक्रेते जास्त नफा मिळवण्यासाठी अशा स्वरूपाचे उद्योग करत आहे.
अशा सर्व गंभीर विषयावर कृतीशिल कारवाई कृषी विभागाने करावी अशी मागणी या निवेदनाव्दारे आम्ही करीत आहोत. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे,उपमहानगरध्यक्ष ललित शर्मा,चेतन पवार,सतिष सैदाणे, शहर सचिव महेंद्र सपकाळे, शेतकरी सेनेचे अविनाश पाटील, संदीप मांडोळे, रज्जाक सैयद, प्रकाश जोशी, महेश माळी, विशाल कुमावत, पवण सपकाळे, किशोर खडसे उपस्थित होते.