TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवडमध्ये रंगली आमदार आणि खासदारांमध्ये उड्डाणपूल उद्घाटन श्रेयवादाची लढाई !

उड्डाण पूलवरील आमदारांनी सुरु केलेली वाहतूक खासदारांनी बंद केल्याची चर्चा ; नंतर आमदारांनी पुन्हा केली सुरु वाहतूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2023
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड रेल्वे स्थानकावर सेवाग्रामसह इतर रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. यासाठी जवळपास ४०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. नेमके याच दिवशी बोदवड- ते मुक्ताईनगर उड्डाण पुलावरुन वाहतूक सुरु करण्यासाठी राजकारणही रंगले.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा उड्डाणपूल सकाळी १०:३० वाजता वाहतुकीसाठी सुरु केला. मात्र हा पूल तासाभरात ११:३० वाजता पुन्हा बंद करण्यात आला. याबाबत चर्चा अशी रंगली होती की, पूल सुरु करण्यात आला ही बातमी समजताच खासदार रक्षाताई खडसे यांनी उदघाट्न न करता पूल कसा सुरु केला?, ही विचारणा करत ही वाहतूक पुन्हा बंद करायला लावली. आपण वाहतूक सुरु करून दिलेला पूल पुन्हा बंद करण्यात आला. हे समजताच आमदारांनी पुन्हा नांदगाव येथे येऊन या दुपारी ३:३० चे सुमारास येऊन पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यास भाग पाडल्याचे कळते.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

बोदवड रेल्वे स्थानकावर अनेक गाड्यांना थांबा देण्यात आला होता. पण कोरोना काळापासून सेवाग्रामसह चार गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला. याबाबत प्रवासी व अनेक संघटनांनी वेळोवेळी निवेदन दिले पण काही एक उपयोग झाला नाही. शेवटी आज त्याचा उद्रेक झाला आणि आज पोलिस बंदोबस्त आंदोलन झाले. त्यामुळे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे ही उपस्थित होते. त्यावेळी बोदवड- मुक्ताईनगर रेल्वे उड्डाणपुलावर नागरिक व वाहनांची एकच गर्दी झाली. त्यावेळी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना पोलिसांनी लावलेले बॅरिकेडस्‌ काढण्यास सांगत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला.

याबाबत दुपारी रेल्वेचे विभागीय अधिकारी यांच्या आदेशाने सदर ठेकेदार यांनी पुलावरील वाहतूक बॅरिकेडस्‌ लावून बंद करायला लावली. आपण सुरु केलेली वाहतूक बंद करायला लावल्याचे कळताच आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा मुक्ताईनगरहून बोदवडच्या उड्डाण पुलावर पोहचले आणि रेल्वे अधिकारी व ठेकेदाराला विचारणा केली. आपण पुलाचे काम पूर्ण केल्याचे ठेकेदाराने सांगितले. यानंतर आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा बॅरिकेडस्‌ बाजूला केले आणि पुल पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला. या उड्डाणपुलावरील राजकारणाची बुधवारी दिवसभर चर्चा सुरु होती.

याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता सदर उड्डाणपूल आपण नागरिकांना येत असलेल्या अडचणीची जाणीव ठेऊन वाहतूक सुरू केली. परंतु नंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा पूल बंद केला?, हा प्रकार निंदनीय असून श्रेयासाठी नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर याबाबत खा. रक्षाताई खडसे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

भोलाणे वासियांनी दिलेल्या प्रेमापोटी कामातून उतराई होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समीर वानखेडे मोदींहून पुढे गेले ; नवाब मलिकांनी पँट, शर्ट आणि बुटांचा हिशोब सांगितला

November 2, 2021

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची वीज कर्मचाऱ्यांसोबतची बैठक फिस्कटली !

November 13, 2020

पुढची चार वर्षं कशी जातील ते भाजपला कळणार नाही; जयंत पाटील

November 16, 2020

खुशखबर : भाऊंचे उद्यानसह महात्मा गांधी उद्यान मंगळवारपासून खुले

October 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group