धरणगाव (प्रतिनिधी) परभणी येथे भारतीय संविधान प्रतिमेचे तोडफोड करणाऱ्या समाज कंटकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी संबंधित प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
परभणी येथे भारतीय संविधान प्रतिमेचे तोडफोड करणाऱ्या दोषी समाज कंटकावर कठोर कारवाई करावी, तसेच परभणीतील पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असून त्यांना न्याय मिळावा व त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, परभणीतील ज्या भिमसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत, ते मागे घ्यावेत, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी व पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर संबंधित समाजकंटक व नेत्यांवर कठोर कारवाई करुन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, जेणेकरुन समाजात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तो झाल्यास त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहिल, असे लेखी निवेदन धरणगाव येथील माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे व शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, भीमसैनिकांनी नायब तहसीलदार संदीप मोरे यांना दिले आहे.