TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पथदिवे, रेल्वे बोगद्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करा! उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील आशाबाबा नगर आणि सेंट्रल बँक कॉलनीला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून रेल्वे बोगदा कामी येऊ शकतो. अशी माहिती नगरसेवकांनी दिली असता रेल्वे बोगदा करण्यासाठी आणि जुना बोगदा दुरुस्तीकामी तात्काळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करावा. अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या.

‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १० मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक सुरेश सपकाळे, चेतन सनकत, माजी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, मनोज आहुजा, भारत कोळी, मनोज काळे, शफी शेख, बंटी बारी, अतुल बारी, मनोज काळे, कुंदन काळे,
आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

पाईपलाईनचे काम पूर्ण करून जोडण्या त्वरित द्या

पिंप्राळा परिसरात असलेल्या सिद्धीविनायक कॉलनीत नाल्यामुळे अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्याचे काम अपूर्ण राहिले असल्याची समस्या नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांनी अधिकाऱ्यांनी सूचना देत मक्तेदाराच्या प्रतिनिधीशी बोलण्यास सांगितले. पुढील पंधरा दिवसात काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गणपती नगरात देखील काही ठिकाणी अमृत योजनेचे काम बाकी असल्याने ते पूर्ण करावे, असे उपमहापौरांनी सांगितले.

पथदिवे सुरू करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा

आनंद मित्र सह गृह निर्माण संस्था परिसरात रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. खांबामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ते रस्त्याच्या एका कडेला स्थलांतरित करून रस्ता मोकळा करावा, अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या. खंडेराव नगर, आझाद नगर परिसरात जवळपास २ हजार घरे असून एकही पथदिवा सुरू नाही. अनेक वेळा पाठपुरावा केला तरीही पथदिवे सुरू होत नसल्याची समस्या नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली. आझादनगर परिसरातील पथदिवे लवकर सुरू होणार असून खंडेराव नगरात केबल टाकावी लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी अशा सूचना उपमहापौरांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.

अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे

खंडेराव नगर परिसर आणि मल्हार मंदिर मुख्य रस्त्यावर काही नागरिकांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केले असल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी नागरिकांनी मनपाला अर्ज द्यावा आणि मनपा अधिकाऱ्यांनी ९ मीटर रस्त्याची मोजणी करून अतिक्रमण हटवावे अशा सूचना केल्या.

आझाद नगर आणि हुडकोच्या विकासासाठी कामांची तरतूद करावी

आझाद नगर परिसरातील आणि पिंप्राळा हुडको परिसरातील अनेक विकास कामे अद्यापही प्रलंबित आहेत. नागरिकांना सोय सुविधा मिळत नसल्याचे नगरसेवकांनी मांडले. उपमहापौर सुनील खडके यांनी प्रलंबित कामांचा आढावा घेत काही कामांचा समावेश दलितोत्तर विकास निधी किंवा अल्पसंख्याक विकास निधीत करावा असे सांगितले. पिंप्राळा हुडकोतील बिल्डिंग क्रमांक १ ते २६ येथे गटार तयार करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, असेही उपमहापौरांनी सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

असभ्य वर्तन भोवले : रावेर पोलिस ठाण्यातील कर्मचारी निलंबित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठवाडा समन्वयकपदी मयुर मोरे यांची नियुक्ती

July 11, 2021

गुगलने वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बनवले खास डूडल

March 20, 2021

कानसवाडेमधील तरुणांसाठी व्यायामशाळा तयार ; पालकमंत्र्यांकडून तरुणांना प्रोत्साहन !

March 1, 2024

जळगावकर सावधान : तीन पत्ती, ड्रॅगन टायगर गेम खेळताय तर जरा जपून !

January 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group