बोदवड (प्रतिनिधी) येथील रांका विद्यालयात दि .बोदवड. सार्व .को-ऑप. एज्युकेशन सोसायटी. लिमिटेड. बोदवडचे अध्यक्ष मिठूलालजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अजय जैन ,सचिव विकास कोटेचा, ज्येष्ठ संचालक श्रीराम बडगुजर, अशोक जैन, आनंद जैस्वाल, रमेश जैन, रविंद्र माटे तसेच प्रमुख अतिथी हेमंत कुमार काथेपुरी गटविकास अधिकारी प.स. बोदवड, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. पाटील, उपमुख्याध्यापिका एम. एस. बडगुजर ,उपप्राचार्या नेमाडे, पर्यवेक्षक आर.के.तायडे, जे. एन. माळी, तालुका विज्ञान समनव्यक वनिता अग्रवाल,केंद्रप्रमुख गोपाल पाटील,प्रतिभाचौधरी,संजय पाटील आणि तालुक्यातील विविध शाळातील विज्ञान शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी- विद्यार्थिनी, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा अध्यक्षीय सूचना गट शिक्षणाधिकारी बी .एन. लहासे साहेब यांनी मांडली कार्यक्रमाच्या सुरुवातीला गीत मंच न.ह.रांका हायस्कूल बोदवड यांनी स्वागत गीत सादर केले. विद्यालयातील विद्यार्थिनी कु. संस्कृती बुंदे ही डॉ.होमी भाभा परीक्षेत सेकंड लेव्हलपर्यंत पोचल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा गुणगौरव करण्यात आला.
आपल्या मनोगतात हेमंत कुमार काथेपुरी यांनी “विद्यार्थ्यांमध्ये जन्मजात असलेल्या सुप्त गुणांना विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून ओळखून त्यांना चांगली संधी मिळवून दिली तर तो पुढे एक चांगला संशोधक, शास्त्रज्ञ बनू शकतो” असे प्रतिपादन केले .सचिव श्री. विकास कोटेचा यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाला बाजूला ठेवून चालणार नाही तर विज्ञानामुळेच मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात अमलाग्र बदल शक्य असतात असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल यांनी विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उपकरणे मांडली त्यांचे कौतुक केले.
सदर विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात 66 माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात 23 तर प्राथमिक शिक्षक गटात ४ उपकरणे मांडण्यात आली .त्यात प्राथमिक गटात– अयाज पिंजारी याचे (वाहतूक नियंत्रण )जि. प. उर्दू मुलांची शाळा बोदवड, रमेश बडगुजर याचे (मॅथ इज राईट)न. ह. रांका हायस्कूल, बोदवड, कु.साची अग्रवाल हिचे( ड्रिप इरिगेशन) रोज पेटल्स इंग्लिश मीडियम स्कूल, बोदवड, उत्तेजनार्थ सोहम करांडे (मेटल डिटेक्टर )जी .जे. राजपुत स्कूल बोदवड) या उपकरणांना तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात कु .कोमल राजगुरे व नेहा माळी (एग्रीकल्चर फार्मिंग)न.ह.रांका हायस्कूल, बोदवड ,वैभव निशाणकर (ट्रान्सफॉर्मेशन )जी. जे .राजपूत इंटरनॅशनल स्कूल, वरखेड. राकेश अवया (साखर कारखाना) शासकीय आश्रम शाळा पळसखेडा, उत्तेजनार्थ ज्ञानेश्वर भुसारी (स्मार्ट सिटी) ची.स. महाजन माध्यमिक विद्यालय जामठी तसेच प्राथमिक शिक्षक गटात समीना बेगम शेख बशीर (गणितीय मॉडेल) जि. प .उर्दू मुलांची शाळा, बोदवड .माध्यमिक शिक्षक गटात अमित कुमार परखड ची.स. महाजन विद्यालय, जामठी प्रयोगशाळा परिचर गटात राजू पालवे( हवामान मापक )न.ह.रांका हायस्कूल, बोदवड. आदी उपकरणांनी क्रमांक पटकाविले.
सदर विज्ञान प्रदर्शनात परीक्षणाचे कार्य प्राथमिक गटात एस. व्ही. वराडे , श्रीधर पालवे, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात जी. डी. वराडे, शोभना चव्हाण , शिक्षक व प्रयोगशाळा परिचर गटात शेख वसीम शेख रसूद, शरद पवार यांनी पाहिले. विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्याध्यापक श्री. पी.एम. पाटील यांनी क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या उपकरणांचे गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान प्रदर्शन प्रमुख एस. एस. नंदवे सहाय्यक प्रा.महेंद्र पंडित ,जे. जी. बडगुजर तसेच सर्व विज्ञान शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जीवन राऊळ व डॉ. विश्वजीत सिसोदे यांनी तर आभार निशांत महाजन व दीपक चौधरी यांनी मानले.