जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या एका शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील स्टॉप रूम मध्ये विद्यार्थिनीला बोलवत शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीच्या आईने केला आहे.
दरम्यान पीडित विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगेश पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित शिक्षकाचे नाव आहे. एरंडोल तालुक्यातील एका गावातील विद्यालयातील स्टाफ रूममध्ये मंगेश हरी पाटील (रा. पाचोरा) या शिक्षकाने विद्यार्थिनीला दिनांक 11 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बोलवले. यावेळी विद्यार्थिनींचे दोन्ही हात टाकून मंगेश पाटील याने विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केले. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात मंगेश पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर संशयित शिक्षक हा फरार असून पोलिसांकडून फरार शिक्षकाचा शोध सुरू आहे. तसेच पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार हे करीत आहे.