साकळी (प्रतिनिधी) येथील चोपडा-यावल मार्गावर तहसीलदारांच्या मार्गदर्शना खालील महसुलच्या पथकाने काल रात्रीच्या वेळी विनापरवाना अवैद्यरित्या वाळुची वाहतुक करणाऱ्या डंपरला जप्त करण्यात आले आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी १३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चोपडा यावल मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया जवळ यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंजाळे येथील तलाठी शरद सुर्यवंशी, कोतवाल निलेश गायकवाड, यांच्या पथकाने अवैद्य मार्गाने डंपर क्रमांक एमएच १९ सिवाय ८६८६या वाहनातुन वाळुची वाहतुक करतांना पकडण्यात आले असुन त्या डंपर वर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यावल शहर व तालुक्यातील विविध ठीकाणी ट्रॅक्टर द्वारे मोठया प्रमाणावर वाळुची अवैद्य मार्गने वाळुची विनापरवाना सर्रासपणे वाहतुक करण्यात येत असुन, महसुल प्रशासनाने तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.