धरणगाव ता. नांदेड (प्रतिनिधी) गावातील तरुण मुलांना आणि क्रिकेट प्रेमींना दिलेला शब्द अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळला असून गावातील व्यायाम शाळेच्या बांधकामाची निविदा नुकतीच निघाली आहे.
नांदेड येथे दिवाळीच्या वेळेस शिवसेनेतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा पालकमंत्री उद्घाटनासाठी आलेल्या असताना त्यांनी सर्व क्रिकेटप्रेमी, युवासेना शिवसेना व तालुका उपाध्यक्ष भरत सैंदाणे यांना गावात साहित्यासह व्यायम शाळा बांधण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार नांदेड गावासाठी व्यायाम शाळा मंजूर केली आणि परत एमपीएससी, यूपीएससी यासाठी सराव करणाऱ्या किंवा पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका सुद्धा पुढील काळात करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तरुण मुलांमध्ये आनंदाचे वातावरण असून तरुणाई व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.