अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जण जागीच ठार झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-बहिरम मार्गावर हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या अपघातातील मृतांमध्ये बहिरम येथील ३ आणि बोधड येथील ३ जणांचा समावेश आहे.