वर्धा (वृत्तसंस्था) आपल्या प्रेयसीचे इतरत्र संबंध असल्याच्या संशयातून तरुणाने वायरने गळा आवळून तिच्याच घरात तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आशिष ऊर्फ रमेश आढाऊ (३४, रा. गणोरी, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मृतक शामल उत्तम वैद्य (वय २१) ही अल्लीपूर येथील रहिवासी होती. ती शिक्षणाकरिता गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ येथे राहत होती. यवतमाळच्या पृथ्वीराज देशमुख नर्सिंग कॉलेज येथे नर्सिंगचे तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. गेल्या दोन महिन्यापूर्वी तिला अल्लीपूर येथे आणण्यात आणण्यात आले होते. तेव्हापासून ती आपल्या मूळ गावी परिवारासह राहत होती. शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास मृतक तरुणीची आई शेतात निघून गेली. तर तिचे वडील बाजारात निघून गेले होते. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घरी परत त्यावेळी शामल संश्यास्पस्दरित्या मृतावस्थेत आढळून आली. तीचा गळा कशाने तरी आवळल्याचे दिसत होते. त्यामुळे हा खून असल्याचे लागलीच स्पष्ट झाले होते.
पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली तेव्हा मृतक शामल ही यवतमाळ येथील नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असताना तेथेच तिचे यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव व तालुक्यांत येणाऱ्या गणोरी येथील रहिवासी असलेल्या आशिष आढाव या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळल्याची माहिती समोर आली. दोन महिन्यांपूर्वी शामल घरी आली होती. आरोपी आशिष आणि मृतक शामल यांच्यात फोनवरून संवाद सुरू होता. मृत प्रेयसीने आरोपी आशिषला यवतमाळ येथून वर्ध्याला भेटण्यासाठी बोलावले होते.
आशिष हा वर्धा रेल्वेस्थानकावर आला पण, प्रेयसी आली नाही. प्रेयसीनं आशिषला भेटण्याचं टाळत होती. त्याने वारंवार फोनही केला पण तिने घेणं टाळलं. अखेर आशिष हा जवळपास महिनाभर वर्धा रेल्वेस्थानकावरच वाट पाहत होता, असे वृत्त वाहिनीने दिले आहे. शामल आशिषला भेटण्याचे टाळत होती. तिचे इतरत्र संबंध असल्याच्या संशयातून शामलच्या घरी जात तिचा वायरने गळा आवळून खून केल्याची कबुली आशिषने पोलिसांना दिली.
घटनेच्या दिवशी आशिष हा जवळपास एक तास अल्लीपूर गावात होता. मृतक शामलच्या घरी कुणी नसल्याचे पाहून त्याने थेट घरात प्रवेश केला. यावेळी दोघांत वाद झाल्यानंतर त्याने तिचा वायरने गळा आवळून खून केला. दरम्यान, पोलिसांनी आशिषला धामणगाव रेल्वे स्थानकावरून मोठ्या शिताफीने अटक केली. दरम्यान ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले, सहायक पोलीस निरीक्षक दीपक वानखडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, दिनेश बोधकर, मनिष कांबळे, प्रदीप वाघ, अक्षय राउत यांनी केली.
















