धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध समस्यांबाबत शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने, मुख्याधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
स्वच्छता, पाइपलाइसाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, बंद हायमास्ट दिवे सुरू करावे, राष्ट्रध्वज पूर्ववत लावणे, तेली तलावाची स्वच्छता आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या.शहरातील साने पटागंणावर स्वच्छता मोहीम राबवावी, मोठा माळीवाडा परिसरातील फुलहार गल्लीतील मोटार चार महिन्यांपासून बंद आहे, ती दुरुस्त करावी, शहरातील हायमास्ट दिव्यांची दुरुस्ती, प्रजासत्ताक दिनापुर्वी राष्ट्रध्वज लावावा, घरपट्टी २०टक्क्यांवरून ३ टक्के करावी, अशा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवा सेना जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख अॅड. शरद माळी, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, सुनील चव्हाण, भागवत चौधरी, धिरेंद्र पुरभे, युवासेना शहर प्रमुख लक्ष्मण माळी, पप्पू कंखरे, चेतन जाधव, गणेश महाजन आदी उपस्थित होते.