धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील ठाकरे गटाचे युवासेना उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
सचिन चव्हाण यांनी आपण ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि विकास कामांनी प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगी सचिन चव्हाण यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात प्रवीण चव्हाण, आनंद चव्हाण, कमलेश दाभाडे, प्रवीण पारधी, विकी साळुंखे, बबलू पारधी, मोहित चव्हाण, अमृत पवार, सुनील जाधव, कुणाल चव्हाण, प्रदीप साळुंखे, पवन चव्हाण, गोपाल चव्हाण, गणेश साळुंखे, मुकेश चव्हाण, अजय पारधी, दिगंबर पारधी, आकाश पवार, अमोल चव्हाण, सुरेश सोनवणे, दिनेश पवार यांचा समावेश होता.
यावेळी माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, उद्योजक भगवान महाजन, गटनेते पप्पू भावे, विजय महाजन, वासू चौधरी, अभिजित पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, भानुदास विसावे, पप्पू कंखरे, हेमंत चौधरी, भैय्या महाजन, पवन महाजन, संजय चौधरी, तौसीफ पटेल, धीरेंद्र पुरभे, अहमद पठाण, भरत महाजन, संभाजी धनगर, संतोष महाजन, बालू जाधव, पापा वाघरे, बुटा पाटील, बुटा महाजन, विनायक महाजन, जयेश महाजन, विजय प. महाजन, यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.