धरणगाव (प्रतिनिधी) येथील न्यायालयात २१ एप्रिल २०२२ रोजी आरोपी योगेश पांडुरंग सातपुते विरुद्ध भादवि ३५४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्यास भादवि ३५४ या कलमाअंतर्गत ५ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व ५०६ प्रमाणे दोन वर्ष साधी कैदेची शिक्षा व भादवि ३५४ प्रमाणे १०,००० दंड व ५०६ प्रमाणे १०,००० दंड लावण्यात आला होता. परंतू आता अपिलाचा निकाला पर्यत 5 वर्षाची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे.
आरोपी याने १ महिन्याचा जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी अपील क्र. ५५/२०२२ दाखल केला. प्रस्तुतचे अपील जिल्हा व सत्र न्यायाधीश खडसे यांच्याकडे होते. यात जिल्हा व सत्र न्यायालय जळगाव यांनी आरोपीची तीन वर्षांची शिक्षा अपिलाचे कामकाज निकालापर्यंत शिक्षा स्थगित करण्याचे तसेच दोन वर्षाची साधी कैदेची शिक्षा स्थगितीचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोपीस २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने विशेष म्हणजे आरोपीस फक्त अपिलाच्या तारखेला नियमित हजर राहावे एवढीच अट घातली आहे. आरोपीतर्फे कामकाज ॲड. वसंत आर. ढाके, ॲड. प्रसाद ढाके व ॲड. मनोज दवे यांनी कामकाज पाहिले.