TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शास्त्रशुद्ध शेतीबरोबर शाश्वत शेती करण्याचे आवाहन

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2025
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खरीपपूर्व नियोजन बैठक अत्यंत महत्त्वाची असून ही प्रक्रिया केवळ औपचारिकता नसून शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षभराच्या श्रमाचे नियोजन असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी दिलेली जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडावी. अधिकारी व कर्मचारी यांनीही ही बाब लक्षात घेऊन काम करावे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगून खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथे जळगाव व धरणगाव तालुक्यांकरिता संयुक्त खरीपपूर्व नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी बदलत्या हवामान व संभाव्य खरीप आव्हानांवर चर्चा करत शेतकऱ्यांना शाश्वत, शास्त्रशुद्ध शेतीसाठी सज्ज राहण्याचे मार्गदर्शन केले.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

पालकमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन :
यंदा तापमान अत्यंत वाढले असून मशागतीची कामे शक्यतो सकाळी लवकर पूर्ण करावीत. निसर्गचक्र बदलत असल्याने धूळपेर टाळावी आणि बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी आंतरपीक व मिश्रपीक पद्धती अवलंबाव्यात. अनधिकृत कंपन्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत. खरेदीचे पक्के बील घेऊन ते हंगाम अखेरपर्यंत सुरक्षित ठेवावे.

गावपातळीवरील कृषी सहाय्यक व विस्तार अधिकाऱ्यांनी नियमित शेतशिवार भेटी द्याव्यात, तसेच सेवा कार्य अधिक गतिमान होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व इतर रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांना दिले.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थी – पूजा संदीप भालेराव, सुनंदा अशोक सपकाळे व गणेश लक्ष्मण सपकाळे यांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात आले. अपघातग्रस्त कुटुंबांना बियाणे व निविष्ठा मोफत वितरित करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

या बैठकीदरम्यान कुवारखेडे येथील शेतकरी वंदना श्रीराम पाटील यांना थ्रेशर, तर दिलीप सोनवणे व हिराबाई कोळी यांना ट्रॅक्टर वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला.

विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी सांगितले की, नाशिक विभागातील खरीपपूर्व नियोजन बैठकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातून होत असून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत आवश्यक निविष्ठा पोहोचविण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने घेतले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी आत्मा व कृषी विभागाच्या वर्षभरातील कार्याची सविस्तर रूपरेषा मांडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित भामरे व श्रीमती सुरेखा सपकाळ यांनी केले. आभारप्रदर्शन कृषी अधिकारी शरद पाटील यांनी मानले. या बैठकीस प्रकल्प उपसंचालक आत्मा नाशिक विलास सोनवणे, कार्यक्रम समन्वयक हेमंत बाहेती, तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी सरला पाटील, कृषी अधिकारी धीरज बढे, किरण देसले, शरद पाटील, वैभव सूर्यवंशी, तुषार गोरे, दीपक नागपुरे, नरेंद्र पाटील तसेच कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThe Agriculture Department should ensure that farmers do not face any problems during the Kharif season – Guardian Minister Gulabrao Patil

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांचा विशेष सन्मान — पाळधी येथील भैय्यासाहेब देशपांडे यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिनेता अरमान कोहलीला मुंबई पोलिसांकडून अटक

August 29, 2021

टपाल तिकिटावर छापला चक्क कुख्यात गुंड छोटा राजन, बजरंगीचा फोटो

December 28, 2020

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३४,९७३ कोरोनाबाधित, २६० रुग्णांचा मृत्यू

September 10, 2021

जिल्ह्यातील २३ शासकीय रूग्णालयांमधील अग्नीशामन यंत्रणेसाठी ६ कोटी ५० लाखाचा निधी !

December 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group