TheClearNews.Com
Sunday, July 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांचा विशेष सन्मान — पाळधी येथील भैय्यासाहेब देशपांडे यांचा गौरव

जळगाव (शहाबाज देशपांडे)

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (शहाबाज देशपांडे) जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत असलेल्या शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा व वस्तीगृहांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन कार्यालय, जळगाव येथे ३ मे २०२५ रोजी ‘आदर्श आश्रमशाळा व वस्तीगृह बक्षीस वितरण सोहळा’ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांना आश्रमशाळा व वस्तीगृह व्यवस्थापन, आधुनिक शिक्षणप्रणालींचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेल्या पुढाकारशील भूमिकेप्रमाणेच डिजिटल शिक्षण उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष सन्मान देण्यात आला.

READ ALSO

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 12 जुलै ते 16 जुलै 2026 !

या बक्षीस वितरण सोहळ्याच्या माध्यमातून चांगले प्रशासन, स्वच्छता, गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेतलेली विशेष मेहनत, क्रीडा, सांस्कृतिक आणि तांत्रिक कौशल्यविकास अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेची दखल घेण्यात आली. यामुळे इतर शाळांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल.

शासकीय आश्रमशाळा विभागात लालमाती (प्रथम), वाघझिरा व सर्वे (द्वितीय), अनुदानित विभागात पिंपळे, ता. अमळनेर (प्रथम), लोहारा, ता. रावेर (द्वितीय), वस्तीगृह विभागात आदिवासी मुलींचे वस्तीगृह, जळगाव (प्रथम) व आदिवासी मुलांचे वस्तीगृह, जळगाव (द्वितीय) यांनी अनुक्रमे मानांकन प्राप्त केले. तसेच डिजिटल शिक्षणासाठी प्रोत्साहनपर बक्षीस चांदसर शासकीय आश्रमशाळेला प्रदान करण्यात आले.

या यशामध्ये मनेश तडवी (मुख्याध्यापक, लालमाती), किशोर महाजन (वाघझिरा), सदासीव पवार (सर्वे), उदय पाटील (पिंपळे), सुनील सपकाळे (लोहारा), अलका दाभाडे (गृहपाल), वासुदेव बच्छे (गृहप्रमुख) आणि भैय्यासाहेब देशपांडे यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्वांनी पारितोषिके स्वीकृत केली.

बक्षीसाचे स्वरूप प्रमाणपत्र व रोख रक्कम असे होते. प्रथम क्रमांक विजेत्यांना प्रमाणपत्रासह रु. ७५,०००/- तर द्वितीय क्रमांक विजेत्यांना प्रमाणपत्रासह रु. ५१,०००/- धनादेश प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार व त्यांच्या टीमचा गौरव करण्यात आला.

या उपक्रमामुळे केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढून शिक्षण सुलभ झाले नसून व्यवस्थापनात पारदर्शकतेलाही चालना मिळाली आहे. स्मार्ट क्लासरूम्स, ई-लर्निंग, संगणक प्रयोगशाळा अशा उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिक्षक व गृहपालांना नवे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली आहे.

या यशस्वी उपक्रमामध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, राजेंद्र लवणे, संदीप पाटील, पवन पाटील, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद पाईकराव व विश्वास गायकवाड यांचे विशेष योगदान राहिले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी विभागाच्या कामाची प्रशंसा करत, भविष्यकाळात अशाच उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. बक्षीस वितरण उपक्रमामुळे जिल्ह्यातील आश्रमशाळा व वस्तीगृहांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonIntegrated Tribal Development ProjectYaval receives special honor — Bhaiyasaheb Deshpande from Paladhi honored

Related Posts

गुन्हे

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

July 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 12 जुलै ते 16 जुलै 2026 !

July 12, 2026
धरणगाव

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

July 11, 2026
गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
गुन्हे

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जुलै 2026 !

July 11, 2026
Next Post

हातात कोयता घेऊन दहशत माजवणारा अटकेत ; चाळीसगावात पोलिसांची धडक कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भंडारा अग्नी तांडव प्रकरण : दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करा : देवेंद्र फडणवीस

January 9, 2021

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती

January 1, 2025

खंडणीप्रकरणी पिंपरीत भाजपच्या विद्यमान नगरसेवकाला अटक

February 2, 2022

जळगाव पोलिसांचा डंका, जळगाव संघाने मिळवले सर्वसाधारण विजेतेपद !

November 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group