TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बुध्दिबळ खेळात जीवन जगण्याची कला – माजी आमदार सौ. मधुभाभी जैन !

महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा प्रारंभ; अंध खेळाडूसह सहा वर्षाचा चिमुकला, ७३ वर्षाचे वयस्कही सहभागी !

vijay waghmare by vijay waghmare
July 25, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘प्रत्येकाला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा अचूक अंदाज बांधावा लागतो. त्यादृष्टीने वर्तमानात कृती करावी लागते. कुठं थांबलं पाहिजे, वळण केव्हा घेतले पाहिजे हे डोळसपणे बघावे लागते. बुध्दिबळ हा खेळ सुद्धा आपल्याला सकारात्मक जीवन जगण्याची कला शिकवितो. आत्मचिंतन करुन भविष्यातील लढाईची रणनिती आखण्यासाठी मदत करतो. सृजनशील विचारांना चालना बुध्दिबळ खेळातून मिळते.’ असे मार्गदर्शन माजी आमदार सौ. मधुभाभी जैन यांनी केले.

एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीमचे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे आज (दि. २५) पासून २८ जुलै २०२४ दरम्यान केले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी अध्यक्ष म्हणून माजी आमदार सौ. मधुभाभी जैन बोलत होत्या. प्रमूख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र बुध्दिबळ असोसिएशन व जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष फारूक शेख, सचिव नंदलाल गादिया, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्हाईस प्रेसिडेंट-मिडीया अनिल जोशी, चिफ ऑरबिटर गौतम रे उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. सौ. मधुभाभी जैन आणि रविंद्र नाईक यांनी बुध्दिबळ पटावर चाल करुन स्पर्धेला सुरवात केली.

READ ALSO

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

नंदलाल गादिया यांनी जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनने राबवित असलेल्या उपक्रमांविषयी प्रास्ताविकात सांगितले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील सानिया तडवी व आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी बुध्दिबळ स्पर्धेला शुभेच्छा देताना सांगितले की, ‘जैन स्पोर्टस अकॅडमी व जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनद्वारे आयोजीत फिडे मानांकित स्पर्धेमुळे बुद्धिबळ खेळाला प्रोत्साहन मिळेल. राज्यातून आलेल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा मोलाची आहेच मात्र जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ती पोषक ठरेल.’

जैन इरीगेशन सिस्टीम्स लि, जैन स्पोर्ट्स अकॅडमी व खान्देश सेंट्रल यांच्या सहकार्यातून झालेल्या राज्य वरिष्ठ खुल्या गटासाठी राज्यातून १६२ बुद्धिबळ पटूंनी सहभाग घेतला. स्विस लिग पध्दतीने खेळल्या गेल्या या स्पर्धेत आज दोन डाव खेळले गेले. सोलापूरची सृश्रीती विकास मोरे या अंध खेळाडूंने सहभाग घेऊन सर्वांची मने जिंकली. तर जळगावचा कबीर श्रीकांत तडवी या सहा वर्षाच्या चिमूकल्याने सौ. मधुभाभी जैन यांच्या वजरीला मागे घेण्यास भाग पाडले. ७३ वर्षाचे वयस्क खेळाडूंनी आपला अनुभव अजमावला.

जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे उपाध्यक्ष शकील देशपांडे, सहसचिव चंद्रशेखर देशमुख, कार्यकारणी सदस्य तेजस तायडे, रविंद्र दशपुत्रे, विवेक दाणी आदी उपस्थित होते. बुध्दिबळाचे आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे, जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकारी यावेळी उपस्थित होते. अरविंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर देशमूख यांनी आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
जळगाव

वीजग्राहकांनो, सायबर भामट्यांपासून रहा सावध!

April 14, 2026
जळगाव

जी. एस. हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महासभेस VC द्वारे उपस्थित राहण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

April 13, 2026
गुन्हे

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

April 13, 2026
Next Post

जळगाव परिमंडल: पंतप्रधान सुर्य घर योजनेचे ४१७० प्रस्ताव मार्गी योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या सुचना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोसरी भूखंड प्रकरण : तपास यंत्रणा सत्तेतील व्यक्तींच्या तालावर नाचताय, न्यायालयाची गंभीर टिप्पणी : एकनाथराव खडसे यांची माहिती ! (व्हिडीओ)

October 23, 2022

TET घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं ; सत्तार यांनी आरोप फेटाळले !

August 8, 2022

वर्षा राऊतांचे ईडीला पत्र, चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती

December 29, 2020

गाझियाबाद सीमेवर एका वृद्ध शेतकऱ्यानं संपवलं आयुष्य; आत्महत्येसाठी सरकारला ठरवलं जबाबदार !

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group