TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात? ; जाणून घ्या… पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे नेमकं कारण !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2022
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) रशिया आणि युक्रेनमधील वाद शिगेला पोहचला आहे. रशियाने युक्रेनमधील 11 शहरांवर हल्ले करून तेथील लष्करी ठिकाणे उद्धवस्त केले आहेत. यानंतर NATO रशियावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यावरून आता जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आहे. हे तिसरे महायुद्ध टाळण्याचे अनेक देशांचे प्रयत्न आहेत, पण युद्ध झालेच तर जगावर मोठे परिणाम पडणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रशिया व युक्रेनमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडीही तीव्र होत होत्या. अमेरिका, ब्रिटेन आदी देशांनी रशियाच्या हल्ल्याची शक्यताही वर्तवली होती. शेवटी ज्याची भीती होती ते रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

रशियाने याआधीच पूर्व युक्रेनमधील ‘डोनेस्तक’ आणि ‘लुहान्स्क’ येथे सैन्य पाठवले होते. यासोबतच रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेजवळ तैनात आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या स्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आधीच सांगितले आहे की रशिया दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील सर्वात मोठ्या युद्धाची तयारी करत आहे. रशिया आणि युक्रेनचे संबंध अधिकच ताणले जात आहेत. कारण युक्रेनच्या संरक्षणासाठी अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी नाटो देशांनीही आपले सैन्य पाठवले आहे. दुसरीकडे, रशिया युक्रेन सीमेवर शस्त्रास्त्रे आणि सैन्याची तैनाती सतत वाढत आहे. याआधी जगाला दोन महायुद्धांचा सामना करावा लागला आहे. दोन्ही महायुद्धात जगात कोट्यावधी मृत्यू तर झालेच पण उपासमार, महागाई अशी परिस्थिती निर्माण झाली.

कसे घडले पहिले आणि दुसरे महायुद्ध

पहिले महायुद्ध
1) 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत चालले. या युद्धाची जबाबदारी कोणताही देश घेत नाही. पहिल्या महायुद्धाचे कारण ऑस्ट्रिया- हंगेरी साम्राज्याचे वारस व त्यांच्या पत्नीचा मृत्यू हे असल्याचे मानले जाते.
2) जून 1914 मध्ये ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचे वारस आर्कड्यूक फर्डिनांड आपल्या पत्नीसह बोस्नियाच्या सारेव्होला भेट देत होते. 28 जून 1914 रोजी त्यांची हत्या झाली. त्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा 14 वा वाढदिवसही होता. या हत्येचा आरोप सर्बियावर होता.
3) एका महिन्यानंतर ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. यानंतर हळूहळू बाकीचे देशही त्यात सामील झाले आणि दोन देशांच्या युद्धाचे रूपांतर महायुद्धात झाले. या युद्धात जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आदी देश सहभागी झाले होते.
4) सुमारे 4 वर्षांच्या युद्धानंतर, 11 नोव्हेंबर 1918 रोजी जर्मनीच्या शरणागतीने पहिले महायुद्ध संपले. 28 जून 1919 रोजी जर्मनीने व्हर्सायच्या तहावर स्वाक्षरी केली. या करारानुसार जर्मनीलाही आपल्या भूभागाचा मोठा भाग गमवावा लागला होता. जर्मनीवर अनेक निर्बंधही लादले गेले. ब्रिटीश सरकारच्या म्हणण्यानुसार पहिल्या महायुद्धात ९४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

दुसरे महायुध्द

1) पहिल्या महायुद्धाची जबाबदारी जर्मनीवर टाकण्यात आली आणि त्याला व्हर्सायच्या करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले. जर्मन नॅशनल सोशालिस्ट (नाझीझम) पक्षाचा नेता अॅडॉल्फ हिटलरने व्हर्सायचा तह रद्द करण्याचे आश्वासन दिले.
2) फेब्रुवारी 1933 मध्ये हिटलर जर्मनीचा चांसलर बनला. त्यानंतर त्याने स्वतःला हुकूमशहा म्हणून घोषित केले. मार्च 1938 मध्ये जर्मनी आणि ऑस्ट्रिया एकत्र आले. मार्च 1939 मध्ये हिटलरच्या सैन्याने चेकोस्लोव्हाकियावर आक्रमण करून ते ताब्यात घेतले.
3) चेकोस्लोव्हाकिया ताब्यात घेतल्यानंतर पोलंडची वेळ होती. 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मन सैन्य पोलंडमध्ये दाखल झाले आणि याबरोबरच दुसरे महायुद्ध सुरू झाले. यानंतर जग दोन भागात विभागले गेले. एक मित्र राष्ट्र होते ज्यात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, सोव्हिएत युनियन असे देश होते आणि दुसरे होते जर्मनी, इटली आणि जपान हे राष्ट्र होते.
4) हिटलरच्या सैन्याने नॉर्वे, डेन्मार्क, लक्झेंबर्ग, बेल्जियम, नेदरलँड आदी देश काबीज करायला सुरुवात केली. जर्मन सैन्याने सोव्हिएत युनियनविरुद्धही युद्ध पुकारले. जर्मन सैनिक सोव्हिएत सैन्यापुढे फार काळ टिकू शकले नाहीत. पुढे हिटलरने अमेरिकेविरुद्धही युद्ध सुरू केले.
5) सोव्हिएत युनियनच्या पराभवानंतर जर्मन सैनिकांना युरोपीय देशांतूनही हाकलून लावले जाऊ लागले. अमेरिका, ब्रिटन आणि सोव्हिएत युनियनने मिळून जर्मन शहरांवर बॉम्बफेक सुरू केली.
6) जर्मनीचा पराभव जवळजवळ निश्चित असताना, हिटलरने 30 एप्रिल 1945 रोजी आत्महत्या केली. 8 मे 1945 रोजी जर्मनीने आत्मसमर्पण केले.
7) जर्मनीच्या शरणागतीनंतरही जपान हार मानायला तयार नव्हता. यामुळे अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर अणुबॉम्बने हल्ला केला. शेवटी जपाननेही शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध २ सप्टेंबर १९४५ रोजी संपले.
8) दुसऱ्या महायुद्धात 78.5 कोटी लोक मारले गेले, ज्यामध्ये 55 कोटींहून अधिक सैनिक सहभागी होते. एवढेच नाही तर 30 लाखांहून अधिक लोक बेपत्ता झाले होते आणि अणुहल्ल्यामुळे आजही जपानमध्ये अनेक आजार आहेत.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांची कारणे

पहिले महायुद्ध का झाले?- पहिल्या महायुद्धाची जबाबदारी कोणताही देश घेत नाही. पहिल्या महायुद्धाचे कारण ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचा वारस आणि त्याच्या पत्नीची हत्या असल्याचे मानले जाते. सुमारे 108 वर्षांपूर्वी, जून 1914 मध्ये ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचे वारस आर्कडक फर्डिनांड यांनी आपल्या पत्नीसह बोस्नियामधील सारेवोला भेट दिली होती.

तर, 28 जून 1914 रोजी त्यांची हत्या झाली, सर्बियावर खुनाचा आरोप होता. एका महिन्यानंतर ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. हळूहळू अनेक देशांनी त्यात उडी घेतली आणि अशा प्रकारे दोन देशांच्या युद्धाचे रूपांतर पहिल्या महायुद्धात झाले. त्यात जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आदी देश सक्रिय होते. चार वर्षांच्या लढाईनंतर 11 नोव्हेंबर 1918 रोजी जर्मनीच्या आत्मसमर्पणाने पहिले महायुद्ध संपले. 28 जून 1919 रोजी जर्मनीने करारावर स्वाक्षरी केली, ज्याअंतर्गत त्यांना आपला मोठा हिस्सा गमवावा लागला होता.

दुसऱ्या महायुद्धाचे कारण पहिल्या महायुद्धाची जबाबदारी जर्मनीवर लादली गेली आणि व्हर्सायच्या तहावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले असे सांगण्यात आले. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीच्या 20 वर्षांनंतर, जर्मन राष्ट्रीय समाजवादी (नाझीवाद) पक्षाचा नेता अॅडॉल्फ हिटलरने व्हर्सायचा करार रद्द करण्याची घोषणा केली.

मार्च 1938 मध्ये जर्मनी आणि ऑस्ट्रिया एकत्र आले आणि हिटलरच्या सैन्याने 1939 मध्ये चेकोस्लोव्हाकियावर कब्जा केला. 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मन सैन्य पोलंडमध्ये दाखल झाले तेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले. यानंतर जगाचे दोन भाग पडले. एकीकडे मित्र राष्ट्र होते ज्यात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, सोव्हिएत युनियन यांचा समावेश होता तर दुसरीकडे जर्मनी, जपान आणि इटली यांचा समावेश असलेले राष्ट्र होते.

हिटलरच्या सैन्याने नवें, डेन्मार्क, लक्झेंबर्ग, बेल्जियम, नेदरलॅंड आदी देश काबीज करायला सुरुवात केली. अचानक जर्मन सैन्यानेही सोव्हिएत संघाविरुद्ध युद्ध पुकारले. तथापि, जर्मन सैनिक सोव्हिएत युनियनच्या सैन्यासमोर उभे राहू शकले नाहीत. हिटलरने 30 एप्रिल 1945 रोजी आत्महत्या केली आणि 8 मे 1945 रोजी जर्मनीने आत्मसमर्पण केले.

जर्मनीने आत्मसमर्पण करूनही जपान यासाठी तयार नव्हता. त्यानंतर अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर अणुबॉम्बने हल्ला केला. जपानने बळजबरीने आत्मसमर्पण केले तेव्हा दुसरे महायुद्ध 2 सप्टेंबर 1945 रोजी संपले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #World_WarRussia_Ukraine_Crisis

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी धरणगावात भाजपाची निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाणा, पोलीसांची छापेमारी ; पाच महिलांसह सहा पुरुष ताब्यात !

September 13, 2023

‘न्यूज अरेना’ संस्थेचा सर्वे आला समोर ; जाणून घ्या…जळगाव जिल्ह्यात कोणत्या मतदार संघात कोण मारणार बाजी !

June 21, 2023

घराच्या पोर्चमधून मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा !

April 25, 2022

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा !

December 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group