TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सर्वांच्या सहकार्याने जगातील सर्वोत्कृष्ट राम मंदिर निर्माण व्हावे; संत संमेलनात संतांचा सूर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपुर (प्रतिनिधी) श्री राम मंदिर निर्माण कार्यात भारतातील सर्व जाती-धर्माच्या शेवटच्या घटकाचा सहभाग असावा तसेच सर्वांच्या सहकार्यातून श्री राम मंदिराची वास्तु उभी रहावी असे वढोदा प्र सावदा येथे घेण्यात आलेल्या संत संमेलन प्रसंगी उपस्थित संत महंतांनी विचार व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तथा विश्व हिंदू परिषद यांच्या दृष्टिकोनातून भुसावळ जिल्ह्यातील यावल, रावेर, भुसावल, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, शेंदुर्णी या तालुक्यातील संत महंतांचे संमेलन आज श्री निष्कलंकी धाम वढोदा येथे घेण्यात आले. या संमेलनात प्रभू श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान अंतर्गत संत-महंतांची विचार विनिमय सभा घेण्यात आली. याप्रसंगी निधी संकलन जिल्हाप्रमुख परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज, गुरुकुल संस्थानचे शास्त्री भक्तीप्रकाश दास, मुक्ताई संस्थानचे ह-भ-प हरणे महाराज, विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ललित भैय्या चौधरी, विश्व हिंदू परिषद भुसावल, जिल्हा मंत्री योगेशजी भंगाळे, नारायण घोडके, जामनेरचे परमपूज्य श्याम चैतन्य महाराज, शास्त्री भक्तीकिशोर दास, विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष श्रीकांत लाहोटी, धर्माचार्य संपर्कप्रमुख ॲडव्होकेट कालिदास ठाकूर, धर्माचार्य महंत योगीराज महाराज, वृंदावन धाम पालचे शिव चैतन्य महाराज, नवनीत चैतन्य महाराज, श्रीराम मंदिर संस्थान कुसुम्बाचे भरत दास महाराज, हभप नितीन महाराज आदी संत- महंतांसह सुमारे अडीचशे संत-महंत महाराज उपस्थित होते.

READ ALSO

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

यावेळी मुक्ताई संस्थानचे ह भ प हरणे महाराज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, श्रीराम मंदिरासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. आपण भाग्यवान आहोत. या कार्यात आपल्याला सहभागी होता येत आहे. आपण सर्वांनी 100% हिंदू कुटुंबापर्यंत पोहोचून मंदिरासाठी यथोचित निधी संकलन करायचा आहे. मंदिर हे एका व्यक्तीचे नसून आपल्या सर्वांचे असल्याची भावना प्रत्येकाच्या मनी निर्माण व्हावी हाच या मागचा मुख्य उद्देश आहे. भुसावळ येथील नारायण घोडके यांनी श्रीराम मंदिर निर्माण वास्तु बद्दल सर्व विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.

आजच्या संत संमेलन प्रसंगी सर्व संतांची यथोचित उपस्थिती हीच मंदिर निर्माण झाल्याची प्रचिती असल्याचे सतपंथ चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. एखाद्या कार्यक्रमासाठी महाराजांची तारीख घेताना अनेकांना कसरत करावी लागते. मात्र आज एकच तारीख आणि सर्व संतांची उपस्थिती हाच श्री रामरायाचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभाव एकत्र येऊन त्यांनी केलेल्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्व हिंदूंनी संघटित व्हावे, हिंदूंवर होणारे वेगवेगळ्या प्रकारच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे तसेच श्रीरामाचे चरित्र, उत्सव, परंपरा, चालीरीती वर अंधश्रद्धा म्हणून वेळोवेळी आक्रमण होत आहे. त्यासाठी सर्व धर्माचार्य यांनी एकत्रित होणे संघटीत होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सहा महिन्यातून एक वेळा जिल्ह्यातील सर्व धर्माच्या संत महंत यांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना करताच सर्वांनी एक मताने होकार दिला. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यातील संतांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. आपण धनसंचय करून ठेवलेल्या धनाला चोराने चोरून नेण्यापेक्षा राम मंदिर निर्माणासाठी दान करावे. तसेच आपल्याकडे दोन चाकी, चार चाकी वाहन असल्यास आपण या निधी संकलन प्रसंगी द्यावी. असे समारोप प्रसंगी शास्त्री भक्ती प्रकाश दास यांनी सांगितले. यावेळी उपस्थित संत महंतासह राम भक्तांनी आपली देणगी जाहीर केली. या संमेलनाला विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंगदल यांच्या रामभक्त स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. आभार डॉ. चंद्रशेखर चौधरी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
जळगाव

‘प्री वेडिंग शूटिंग’ बंदी… जळगाव जिल्ह्यातील ‘या’ दोन समाजांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय !

April 25, 2023
Next Post

मी भाजपासोबत एकनिष्ठ : आमदार संजय सावकारे (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बारा वर्षीय मुलीसह तिच्या आईचा तरुणाने केला विनयभंग

July 30, 2025

धरणगाव हादरलं : अवघ्या ५० रुपयासाठी गेला एकाचा जीव !

February 8, 2022

जळगावातही विद्यार्थी उतरले रस्त्यावर ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

January 31, 2022

ग.स. सोसायटी शाखा धरणगावतर्फे ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळा उत्साहात !

July 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group