मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं घर व कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातल्यानंतर आता शिवसेनेचे मोठे मोठे नेते आणि त्यांचे मुखिया व त्यांचा परिवार असेच उद्योगधंदे करतात हे सर्वांना माहीत आहे,’ असा थेट आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या बेनामी असतील. त्यांचा कारभार व्यवस्थित नसेल. सरकारी पैसा किंवा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांनी वळवला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. सरनाईक यांच्याबद्दल मी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या,’ असा दावाही सोमय्या यांनी केला. ‘शिवसेनेचे मोठे मोठे नेते आणि त्यांचे मुखिया व त्यांचा परिवार असेच उद्योगधंदे करतात हे सर्वांना माहीत आहे,’ असा थेट आरोपही सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेचे मुंबई, ठाण्यातील अनेक नेते महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हफ्ते घेतात. त्यांच्यावर कारवाई व्हायला नको का?,’ असा प्रश्नही त्यांनी केला.