TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्रातील भाजप सरकार संविधानावर हल्ला करतेय : राहुल गांधी यांची टीका !

vijay waghmare by vijay waghmare
October 2, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चंदीगड (वृत्तसंस्था) केंद्रातील भाजप सरकार संविधानावर हल्ला करीत असून गरीब व दलितांकडे कानाडोळा करून काही मूठभर अब्जाधिशांसाठी काम करीत आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. ‘अग्निवीर’ योजना ही सैनिकांची पेन्शन, कँटिन सुविधा व त्यांना मिळणारा शहीद दर्जा काढून घेण्याचा मार्ग असल्याचा हल्ला त्यांनी चढवला.

हरयाणातील सोनिपत जिल्ह्यात प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार काही मोठ्या उद्योगपतींचे हित जोपासत आहे. पण, देशातील गरीब, शेतकरी आणि युवकांचे कल्याण करण्यासाठी हे सरकार निष्क्रिय ठरले आहे. हरयाणातील एक छोटा व्यापारी मला भेटला व मोदी व हरयाणा सरकारने आपला व्यवसाय उद्ध्वस्त केल्याचे त्याने सांगितले. नोटबंदी व जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी यामुळे आपले नुकसान झाल्याचे व्यापारी म्हणाला. मोदी सरकार अदानी व अंबानी यांची मदत करीत असल्याची कबुली त्या व्यापाऱ्याने दिली, असा प्रहार राहुल गांधी यांनी केला. केंद्र सरकारने सार्वजनिक कंपन्या, शासकीय कारखान्यांचे खासगीकरण केले. शस्त्र बनवण्याचे कंत्राट अदानी व अंबानींच्या कंपनीला दिले. मोदी केवळ अदानी यांना संरक्षण कंत्राट देत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. गुजरातमधील मुद्रा बंदर सध्या अदानी यांच्या नियंत्रणात आहे.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

या ठिकाणी हजारो किलो अमली पदार्थ (हेरॉईन) आढळले पण, या प्रकरणी किती जणांना तुरुंगात पाठवले? असा सवाल राहुल यांनी केला. हरयाणातील युवकांना रोजगार दिला जात नाही. त्यामुळे शेकडो युवकांना विदेशात जावे लागत आहे. प्रसंगी ते अवैध पद्धत अवलंब करीत आहेत. देशातील गरीब, दलित, शेतकरी व मागासवर्गीयांकडे संविधानामुळेच अधिकार आले. पण, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील संस्थांमध्ये याच दलित-आदिवासींना जागा देत नाही. संविधान नष्ट करण्याचा भाजपचा इरादा आहे. पण, आम्ही त्याचे रक्षण करणार आहोत, असे राहुल गांधी यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ अब्जाधिशांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण, शेतकरी, विद्यार्थी, माता-भगिनींचे कर्ज त्यांनी माफ केले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

अमळनेरातील आठवीच्या मुलामुळे वाचले दोघा बालकांचे प्राण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाची लस कधी येणार हे संशोधकांच्या हातात : पंतप्रधान नरेंद मोदी

November 24, 2020

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026

नाशिकहून घरी परतणाऱ्या तरुणाला वाहनाने उडविले ; हेल्मेटसह डोक्याचा चेंदामेंदा !

August 30, 2022

ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील अ‍ॅक्शन मोडवर ; जळगावातील रस्त्यांसाठी मंत्रालयात बैठक !

January 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group