श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मूमधील विमानतळावर मोठा स्फोट झाला आहे. रविवारी सकाळी तांत्रिक विभागात हा स्फोट झाला आहे. ५ मिनिटांच्या फरकानं येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. धक्कादायक म्हणजे जम्मू एअरबेसवर स्फोट घडवण्यासाठी दोन ड्रोनचा वापर करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
IED टाकण्यासाठी ड्रोनचा वापर केला असून यात दोन बॅरेक्सचं नुकसान झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पाच मिनिटात दोन स्फोट झालेत आहे. यातला पहिला स्फोट रात्री १:३७ वाजता आणि दुसरा १:४२ वाजता झाला आहे.
५ मिनिटांच्या फरकानं येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडही घटनास्थळी उपस्थित आहे.