TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव शहराला कधीकाळी पाणीपुरवठा करणारी इंग्रज कालीन पाईपलाईन चक्क चोरी !

पाईपलाईन बंद असल्याचा फायदा घेत चक्क जेसीबीने खोदून पाईपलाईन काढली बाहेर ; पालिका अधिकाऱ्यांनी पकडले रंगेहात !

vijay waghmare by vijay waghmare
December 3, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहराला कधी काळी पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा पंपींग प्लांटवरून येणारी जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे चारी खोदून चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनपा अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून काही मोठे चेहरे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जळगाव शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२ रोजी ते उमाळे येथील फिल्टर प्लॉन्टचे कामकाज पाहण्यासाठी गेलो असता त्यांना कॉण्ट्रक्टर सुमीत सोनवणे यांनी फोन केला. गिरणा पंपींग जवळ आर्यन पार्कच्या समोर असलेली जुनी पाण्याची लोखंडी पाईप लाईन कोणीतरी जेसीबी वाहनाच्या साह्याय्याने चारी खोदुन काढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बोरोले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले.

READ ALSO

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

जेसीबीच्या साहाय्याने चोरी करताना पकडले

सायंकाळी ६.३० वाजेचे सुमारास योगेश बोरोले हे शामकांत भांडारकर (इंजीनिअर), विशाल सुर्वे, दिपक चौधरी यांच्यासह त्याठिकाणी पोहचले. त्यावेळी एक पिवळ्या रंगाचे जेसीबीवरील दोन इसम हे जेसीबीच्या साह्याय्याने जुन्या पाईप लाईन मधील बीडचे पाईप काढताना मिळुन आले. जेसीबी चालक नरेंद्र निवृत्ती पाणगडे, व रवण चव्हाण अशी त्यांची नावे समोर आली.

एकाने काढला पळ, तिघांची सांगितली नावे

अधिकाऱ्यांनी दोघांना जेसीबीच्या खाली उतरण्यास सांगितले असता रवण चव्हाण हा लक्ष विचलीत करुन तेथून पळून गेला. नरेंद्र पाणगडे याचेकडे चौकशी करीत असताना अक्षय अग्रवाल हा देखील त्या ठिकाणी उपस्थित झाला. नरेंद्र पाणगडे यास सदरची पाईप लाईन कोणी खोदावयास सांगितली? अशी विचारणा केली असता त्याने अक्षय अग्रवाल, भावेश पाटील व अमिन राठोड यांचे सांगण्यावरुन खोदली असुन सदर जेसीबी आणण्याबाबत अक्षय अग्रवाल याने मला सांगितल्याने मी सदर जेसीबी आणुन त्याव्दारे पाईप लाईन खोदुन त्यातुन जुने पाईप काढत असल्याचे सांगितले.

जेसीबी, पाईप जप्त, सहा जणांविरुद्ध गुन्हा

अधिकाऱ्यांनी अक्षय अग्रवाल याचेकडे चौकशी केली असता त्यानेच सदर जेसीबी वाहन सदर ठिकाणी पाठविल्याचे सांगितले. यावरून महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता योगेश बोरुडे यांच्या फिर्यादीवरून अक्षय अग्रवाल, नरेंद्र पानगडे, रवण चव्हाण, भावेश पाटील, अमीन राठोड आणि सुनील महाजन या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात एका घड्याळ राजकीय नेत्याचा हात असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

 

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारी व सध्या बंद अवस्थेत असलेली इंग्रज कालीन पाईपलाईन चोरून नेण्याचा प्रयत्न केला. साधारण तीन-चार किलोमीटरची पाईप लाईन होती, साधारण तिची किंमत पाच लाखांची होती.

योगेश बोरोले

(उप अभियंता पाणीपुरवठा विभाग, जळगाव महापालिका)

यासंदर्भात पालिकेच्या उपभियंतांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. तर एक आरोपी अद्याप करार असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

संदीप गावित
(उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
Next Post

फसवणूक केल्या प्रकरणी निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी पाटील यांच्यासह नऊ जणांविरुद्ध अखेर रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव भाजप कार्यालयास माजी खा. ए.टी.नाना पाटील यांची सदिच्छा भेट

June 30, 2021

पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 29, 2024

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा राजीनामा

July 3, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

October 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group