नशिराबाद (प्रतिनिधी) भुसावळ वरून जळगाव कडे येत असताना नागपूर-मुंबई महामार्गावरील नशिराबाद गावाजवळ अचानक भरधाव कारचे टायर फुटल्याने मोठा अपघात झाला. अपघातग्रस्त कार ही दोन वेळा पलटी झाली. मात्र, सुदैवाने कारमधील चारही प्रवाशांचा जीव वाचला असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.
जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनिल भंगाळे हे अनिल झवर, दिनेश मालू, इरफान सालार यांच्यासह शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता यावल-रावेर येथील केमिस्ट संघटनेची बैठक आटोपून जळगावकडे (एम एच १९ सिओ ८२४०) क्रमांकाच्या कारने येत होते. नशिराबादजवळ नागपूर मुंबई महामार्गावर अचानक कारचे तयार फुटले आणि कार पलटली. हा अपघात इतका भयंकर होताच की कारचा पुढचा भाग पुर्णत: चक्काचूर झाले असून कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र कारमधील चौघे बालंबाल बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आहे.