TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसाच्या आत पूर्ण करा ; पालकमंत्र्यांचे निर्देश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. त्याकरीता झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसाच्या आत पूर्ण करुन अहवाल शासनास सादर करा. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज दिलेत.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता रुपा गोजरे, लघु पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता भदाणे, कार्यकारी अभियंता बेहरे, कुलकर्णी, ठाकरे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ ए. डी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चौधरी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

पालकमंत्री पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये याकरीता शेतपिकांचे नुकसानीचे पंचनामे वस्तुनिष्ठ होणे आवश्यक आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांनी तातडीने नुकसानग्रस्त गावातील पंचनामे पूर्ण करावे पंचनामे करण्यासाठी उशीर होता कामा नये याकरीता वरिष्ठ स्तरावर नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात. त्याचबरोबर पुर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करुन नागरीकांना दळणवळण सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी. ज्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात वीजेचे पोल, तारांचेही नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीने नागरीकांना तातडीने वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी युध्दपातळीवर दुरुस्ती मोहीम राबवावी. पाटबंधारे विभागाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन साठवण बंधारे दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रत्येक विभागाने तातडीने आढावा घेऊन आपआपल्या विभागाचे नुकसानीचे अहवाल सादर करुन दुरुस्तीचेही प्रस्ताव सादर करावे. जेणेकरुन सदरचे अहवाल शासनास वेळेत सादर करणे शक्य होईल.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात १४ व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. २४४ मोठी जनावरे, २३० लहान जनावरे मृत्युमुखी पडली आहे. १६०० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. चोपडा तालुका वगळता इतर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ११९ टक्के पाऊस झाला असून जिल्ह्यातील मोठे प्रकल्प ९५ टक्के, मध्यम प्रकल्प ९२ टक्के तर लघु प्रकल्प ८२ टक्के भरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी दिली. जिल्ह्यात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यातील ३२ मंडळात ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून पंचनामे सुरु असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ठाकूर यांनी दिली. घोडसगांव येथील साठवण बंधाऱ्याचा सांडवा वाहून गेल्याने प्रक्लपाचे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे श्री. भदाणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहून गेले आहे तर अनेक ठिकाणी पाईप व मोऱ्या वाहून गेल्याची महिती गोजरे यांनी दिली. तर वीज वितरण कंपनीचे एकट्या चाळीसगाव तालुक्यात ४० लाख तर इतर तालुक्यांमध्ये ३० लाखापेक्षा अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती चौधरी यांनी बैठकीत दिली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निर्लेखित साहित्याच्या विक्री !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाविकास आघाडी सरकार संकटात ; शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये

June 21, 2022

कांताई सभागृहात ९ जुलै रोजी लतादीदींच्या गीतांचा “घरंदाज सूर” कार्यक्रम !

July 6, 2022

जळगाव : दोघ मेव्हण्यांकडून शालकाचा खून !

April 15, 2025

राज्यातील स्वच्छतेच्या महाश्रमदानाची सुरुवात पाळधी गावातून !

October 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group