
जळगाव (प्रतिनिधी) – गणपती विसर्जनाच्या मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश असतानाही संबंधित ठेकेदाराकडून खड्डे बुजविण्यात आले नसल्याने नागरिकांनी पुढाकार घेत लोकसहभागातून रस्त्यावरील खड्डे बुजविले.
गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हे खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात खड्डे बुजविण्यात न आल्याने नागरिकांनी श्रमदानातून हा उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमात प्रणिल धानोरकर, सुधीर देवरे, योगेश कदम, प्रसाद पाटील आणि मयुरेश शिंपी यांच्यासह नागरिकांनी श्रमदान केले. नागरिकांच्या या पुढाकारामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले.
दर रविवारी सकाळी श्रमदानाच्या माध्यमातून परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमात स्वतःहून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी 8888475754 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“प्रशासनाची वाट न पाहता लोकसहभागातून परिसरातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न” या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
















