TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टरनेच हॉस्पिटलमधील नर्सचा मोबाईल चोरण्याची दिली सुपारी ; चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

उल्हासनगर (वृत्तसंस्था) उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी एका डॉक्टरसह दोघांना अटक केली आहे. या डॉक्टरने आपल्या हॉस्पिटलमध्ये कामाला असलेल्या नर्सचा मोबाईल स्नॅचिंग करण्याची सुपारी दिल्याने त्याला अवघ्या 24 तासांत अटक करण्यात आली आहे. सबंधित प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

कॅम्प नंबर एकच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये फिर्यादी महिला नर्स काम करते. तिला 4 एप्रिलपासून सुट्टी देण्यात आली होती. मात्र १० एप्रिलला तिला पुन्हा हॉस्पिटलमधून कामावर येण्याच्या सूचना फोन करुन देण्यात आल्या. त्यानुसार फिर्यादी महिला आपल्या बहिणीसोबत कामाला जाण्यासाठी निघाली. त्यावेळी सी ब्लॉक रोडवर एका अज्ञात व्यक्तीने तिचे केस पकडून मोबाईल जबरीने मोबाईल हिसकावून धूम ठोकली. यानंतर या फिर्यादी महिलेने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली.

पोलिसांनी 24 तासात आरोपींना पकडलं

पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून कारवाई करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपीच्या शोधात होते. यासाठी पोलीस तांत्रिक बाबींचादेखील विचार करु लागले. विशेष म्हणजे तांत्रिक माहितीच्या आधारानेच त्यांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवले. त्यातून पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी सुरुवातीला अरशद खान नावाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या. अरशदने पोलिसांना चौकशीतून मोहम्मद खान या आरोपीचं नाव सांगितलं. मोहम्मद खाननेच आपल्याला मोबाईल स्नॅचिंग करायला सांगितलं असं अरशदने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी मोहम्मदला बेड्या ठोकल्या.

चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

पोलिसांनी आरोपी मोहम्मद खानची चौकशी केल्यानंतर पोलिसांना जी माहिती मिळाली ते ऐकून ते देखील चक्रावले. कारण फिर्यादी महिला ज्या रुग्णालयात काम करते त्याच रुग्णालयाचा डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख याने महिलेचा मोबाईल चोरी करण्याची सुपारी दिली असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. लाईफ केअर हॉस्पिटलचा डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख याने फिर्यादी नर्स महिलेचा मोबाईल जबरीने खेचण्यासाठी आरोपींना सुपारी दिली होती. आणि यासाठी या दोघा आरोपींना डॉक्टर मोहम्मदने दहा हजार रुपये देखील दिले होते.

याआधी नर्सचा मोबाईल स्नॅचिंग करण्याचा प्रयत्न

याआधी 9 एप्रिल रोजी देखील या नर्सचा मोबाईल स्नॅचिंग करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. फिर्यादी नर्स महिलेच्या मोबाईलमध्ये डॉक्टरचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो असल्याचा संशय डॉक्टरला होता आणि त्याच कारणामुळे या नर्सचा मोबाईल जबरीने स्नॅचिंग करण्याची सुपारी डॉक्टर आणि त्याच्या सहकार्याने दिली असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख सह इतर दोघांना अटक

दरम्यान, याप्रकरणी आता मध्यवर्ती पोलिसांनी डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख सह इतर दोघांना अटक केलीय. तर एक आरोपीचा पोलिसांकडून अजूनही शोध सुरु आहे. आता या नर्सच्या मोबाईलमध्ये नक्की आक्षेपार्ह काही आहे का? की फक्त संशयावरून डॉक्टरने तिचा मोबाईल स्नॅचिंग करण्याची सुपारी दिली हे पोलीस तपासात समोर येणार आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सह पोलीस निरीक्षक महेश राळेभात, पोलीस राजाराम कुकले, विलास जरग, सतीश सोनवणे, गणेश बडे, महेश बगाड आणि प्रदीप खरमाडे यांनी विशेष मेहनत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
Next Post

आजपासून बँक उघडण्याची वेळ बदलली ; ग्राहकांना फायदा होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! आधी मुलाला पुलावरून ढकललं मग महिलेनेही नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

June 17, 2022

चोपडा : सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात ; १५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

August 25, 2023

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना बारा बलुतेदारांची आदरांजली

October 31, 2020

जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं : एकनाथराव खडसे

May 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group