TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान सरकारने रचले : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ओबीसींना हक्क द्यायचे नाहीत. यामुळे आज कथितरित्या ओबीसी हिताचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान सरकारने रचले आहे. यामुळे सभागृहात चर्चेची तयारी दाखविणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांचा देखील समावेश आहे. या निलंबनावर आमदार महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, राज्यातील ओबीसी समुदायाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असले तरी महाविकास आघाडी सरकार ढिम्म बसून आहे. त्यांना ओबीसींना हक्क द्यायचे नाहीत. यामुळे आज कथितरित्या ओबीसी हिताचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान सरकारने रचले आहे. यामुळे सभागृहात चर्चेची तयारी दाखविणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.

READ ALSO

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

भाजपच्या आमदारांनी नव्हे तर महाविकास आघाडीच्या आमदारांनी असभ्य वर्तन केल्याचे सर्वांनी पाहिले असून याचे सीसीटिव्ही फुटेज सरकारने तपासण्याची गरज आहे. मात्र, आपल्या आमदारांवर कारवाई करायचे सोडून भाजपच्या आमदारांचे निलंबन करण्याचे काम या सरकारने जाणीवपूर्वक केले आहे. याचाच अर्थ या सरकारला ओबीसींच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही. तसेच भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे महाविकास आघाडी सरकार बदनाम झाले असून सभागृहात आपली कोंडी होऊ नये म्हणून भाजपचे १२ आमदार निलंबित करून विरोधी पक्षाचे संख्याबळ कमी करण्याचे कारस्थान रचल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे.

या अधिवेशनात मराठा व ओबीसी आरक्षण, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची झालेली हानी, कोविड मुळे विस्कळीत झालेली विकासकामे आदींसह अनेक मुद्यांचा समावेश होता. तथापि, सरकारला यावर चर्चा होऊ द्यायची नव्हती. कारण गेल्या काही महिन्यांमधील सरकारचे प्रताप यातून समोर आले असते. यात वाझे प्रकरण, दरमहा १०० कोटींच्या वसुलीचे प्रकरण, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक आदींसह इतर नेत्यांच्या भ्रष्टाचारातील वेगवेगळे कंगोरे अजून जगासमोर आले असते. यामुळे आमदारांना निलंबीत करण्याचा कट रचल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
जळगाव

वीजग्राहकांनो, सायबर भामट्यांपासून रहा सावध!

April 14, 2026
जळगाव

जी. एस. हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महासभेस VC द्वारे उपस्थित राहण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

April 13, 2026
गुन्हे

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

April 13, 2026
Next Post

सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र रचून १२ आमदारांना निलंबित केलं : आशिष शेलारांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोसरी भूखंड प्रकरण : तपास यंत्रणा सत्तेतील व्यक्तींच्या तालावर नाचताय, न्यायालयाची गंभीर टिप्पणी : एकनाथराव खडसे यांची माहिती ! (व्हिडीओ)

October 23, 2022

TET घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं ; सत्तार यांनी आरोप फेटाळले !

August 8, 2022

वर्षा राऊतांचे ईडीला पत्र, चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती

December 29, 2020

गाझियाबाद सीमेवर एका वृद्ध शेतकऱ्यानं संपवलं आयुष्य; आत्महत्येसाठी सरकारला ठरवलं जबाबदार !

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group