TheClearNews.Com
Monday, April 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांनी वारकऱ्यांचा वारसा जपत भजनी मंडळांना केले साहित्याचे वाटप !

वारकरी संप्रदाय व धर्म कार्यासाठी कटिब्ध्द, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही ; ५७ भजनी मंडळांना साहित्य वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) ग्रामीण भागात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तनकार मंडळी वारसा जपत आहे. मात्र, ग्रामीण भागात वारकरी साहित्याची उणिव भासत असल्याने वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे आणि वाढला पाहिजे. सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. जीवन सुकर होण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार महत्वाचे असून वारकरी संप्रदायाचा विचार समाजाला तारू शकतो. नुसते वारकरी साहित्य वाटपापुरते नव्हे तर वारकरी संप्रदाय व धर्म कार्यासाठी नेहमीच कटिब्ध्द राहील, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत ह.भ.प. कैलास महाराज चोपडाईकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव व जळगाव तालुक्यातील ५७ भजनी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

देवाच्या आळंदीचा वारसा जपणारा जळगाव धरणगाव तालुका हा वारकरी संप्रदायात विखुरला आहे. ग्रामीण भागात भजन, किर्तन, हरिनामाचा सप्ताह असे विविध कार्यक्रमाच्या माऊलींच्या हरिनामाचा गजर गावागावांत होत असतो. मात्र, याच हरिनामाला जोड लागते असं म्हणतात लाऊणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्म रस आवडीने म्हणून टाळ मृदंग विना व पेटी यांच्या खूप गरज असते हिच गरज ओळखुन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव व जळगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात ५७ गावांना भजनी साहित्य वाटप करण्यात आले. टप्या टप्याने मतदार संघातील प्रत्येक गावाला साहित्य वाटप होणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीच्या महान पार्श्वभूमीवर साहित्य मिळाल्याने भजनी मंडळांनी आनंद व्यक्त केला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 एप्रिल 2026 !

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, संत आणि कीर्तनकारांच्या सानिध्यात राहिल्याने फायदा झाला. ग्रामीण भागात धार्मिक परंपरा टिकली पाहिजे. म्हणून हा भजनी मंडळांना साहित्य वाटप कार्यक्रम हाती घेतला. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून जिल्ह्यातील वारकरी संप्रदायासाठी अभिवन उपक्रम राबविण्याची मनात इच्छा होती. जिल्हास्तरीय वारकरी भवन होणार असल्याने त्याचा भावी पिढीला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ती पूर्णत्वास येण्याचा मनस्वी आनंद आहे, असे सांगून ना.पाटील पुढे म्हणाले की, काही जण अशा कार्यक्रमावर टीका करतात. मात्र, अशा बदनामीला भिक घालत नाही. जिल्ह्यातील भजनी मंडळांना दर्जेदार साहित्य द्या, वारकरी संप्रदाय टिकेल कसा, असा सवाल निर्माण करीत जिल्ह्यात वारकरी संप्रदाय श्रीमंत कसा राहील,यासाठी प्रयत्न राहील. वारकरी मंडळींच्या कुटुंबात कोणी वारले तर त्या कुटुंबाला वारकरी मंडळातून आर्थिक मदत करता येईल,असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी ह.भ.प.गजानन महाराज यांनी तळागाळात वारकरी संप्रदाय रुजविण्याचे काम वारकरी करीत असतो. गुलाबभाऊंच्या माध्यमातून खान्देशाला उज्जवल नेतृत्व लाभले आहे. या साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात टाळ, मृदृगाचा आवाजाचे पुण्य गुलाबभाऊंना लाभणार असल्याचे श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्रचे अध्यक्ष तथा गौप्रेमी ह.भ.प.गजानन महाराज यांनी सांगितले. तसेच वारकरी संप्रदायाच्या परंपरा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आभारशाळेचे चेअरमन विक्रम (विक्की) पाटील यांनी मानले

वारकरी भवनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार !

शिस्त,भक्ती आणि शक्तीचा उगम म्हणजे वारकरी संप्रदाय होय. वारकरी मंडळींसाठी वारकरी भवन उभारण्याचा मानस होता. आता जळगाव शहरातील खेडी परिसरात वारकरी भवनाच्या ६ कोटी ६ लक्ष्च्या मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. प्रस्ताविकात माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की साधू,संत येती घरा,तोची दिवाळी, दसरा,असे म्हणत आज पाळधी त प्रती पंढरपूर झाले आहे. संतांचा वारसा टिकविण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. आम्ही खारीचा वाटा उचला असून फिरत्या कीर्तन सप्हात ५७ भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. साहित्य वाटपात मापात पाप होणार नाही. नारदाची गादी आहे, साहित्य वाटपाचे महत्व विषद करून समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या वारकरी सांप्रदायाला सदैव सहकार्य राहणार असल्याची ग्वाही प्रतापराव पाटील यांनी दिली. तसेच जळगाव ग्रामीणमध्ये कीर्तन सप्ताह असेल तर त्या कार्यक्रमाच्या पत्रिका मोफत छापून देण्याचे आश्‍वासन प्रतापराव पाटील यांनी यावेळी दिले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे, ह.भ.प. देवगोपाल महाराज शास्त्री , ह.भ.प. बाबा परमहंस जी महाराज, ह.भ.प.चतुर्भुज महाराज धरणगावकर, ह.भ.प. भगवान बाबा धरणगावकर, ह.भ.प.पांडुरंग महाराज आवरकर, ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. शाम महाराज शास्त्री पिंपळगावकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर, ह.भ.प. प्रतिभाताई महाराज जवखेडेकर, जिल्हा प्रमुख निलेश पाटील , धरणगाव तालुका प्रमुख डी. ओ. पाटील , शिवराज पाटील, सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, जनाआप्पा कोळी, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे , जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सरपंच , वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 एप्रिल 2026 !

April 20, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
जळगाव

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 19, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 19 ते 25 एप्रिल 2026 !

April 19, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

April 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 एप्रिल 2026 !

April 18, 2026
Next Post

धरणगाव नाईट ग्रुपतर्फे पोलीस निरीक्षक ढमाले आणि कर्मचारी चौधरी यांचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या शगून जिनिंगमध्ये ट्रकला भीषण आग ; लाखोंची गठान जळून खाक !

May 24, 2023

कासोदा : शेतीच्या वादातून वृद्धास आत्महत्येस प्रवृत्त केले ; तिघांविरुद्ध गुन्हा !

July 7, 2022

…तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार : विश्वास नांगरे पाटील

January 25, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

February 18, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group