अमरावती (वृत्तसंस्था) धामणगाव रेल्वे तालुक्यात आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका वासनांध मुलाने चक्क जन्मदात्रीकडे शरीरसंबंधांची मागणी केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
या संदर्भात पिडीत मातेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३ जून रोजी रात्री आठच्या सुमारास तो धक्कादायक प्रकार घडला. पिडीत महिला रात्रीच्या वेळी घरात काम करीत असताना आरोपी मुलगा तिच्याजवळ गेला. त्यानंतर अतिशय चुकीच्या पद्धतीने बोलून आरोपीने आईकडे शरीरसंबंधाची मागणी केली. एवढेच नावेह तर तिचा विनयभंगदेखील केला.
पोटच्या मुलाने केलेला विकृतपणा बघून पिडीता घाबरली. त्यामुळेच रात्री दत्तापूर पोलिस ठाणे गाठून ३० वर्षी मुलाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ विकृत वासनांध तरुण मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. दरम्यान, जन्मदात्या आईकडेच पोटच्या मुलाने शरीर सुखाची मागणी केल्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.