रायबरेली (वृत्तसंस्था) यूपीच्या रायबरेली इथं एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
यूपीच्या रायबरेली इथं झालेल्या राजेश याच्या खूनासंदर्भात पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. त्यानुसार थूलेहंडी गावात ३० मार्च रोजी राजेशला त्याच्या पत्नीने प्रियकर नान्हू महताबसोबत मिळून भरपूर दारू पाजली. दारू जास्त प्यायल्याने राजेश झोपला. त्यानंतर राजेशची पत्नी आणि प्रियकर दोघेही लैंगिक संबंधात मश्गुल झालेत. परंतू त्याचवेळी राजेशचा डोळा उघडला आणि त्याने आपली पत्नीची स्थिती पाहून त्याला राग अनावर झाला. परंतु संपूर्ण नातेवाईक आणि गावात बदनामी होईल, यामुळे प्रियकर आणि पत्नीने मिळून राजेशची हत्या केली.
पोलिसांना तपासावेळी काही विशेष माहिती हाती लागली नाही. परंतू पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली. तपासात राजेशच्या पत्नीचे गावातील नान्हू महताबसोबत अनैतिक संबंध होते हे कळालं. पोलिसांनी राजेशच्या पत्नीची कसून चौकशी केली असता घटनेच्या दिवशी राजेश, पत्नी रेश्मा आणि महताब यांनी दारू प्यायली होती. राजेशला दारू जास्त झाल्याने तो झोपी गेला. पण जेव्हा राजेशला जाग आली तेव्हा पत्नी आणि महताब यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि त्याने जाब विचारला. त्यावेळी पत्नी आणि तिचा प्रियकर महताब यांनी मिळून राजेशचा गळा दाबला त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पत्नी रश्मी आणि तिच्या प्रियकर नान्हू या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी राजेश, त्याची पत्नी रेश्मा आणि मेहताब यांनी दारू प्राशन केल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. याबबतचे वृत्त ‘आज तक’ हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.